किनवट ता.प्र दि १३ किनवट तालुका हा जिल्ह्याच्या मुख्यालयापासुन १५० कि.मी एवढ्या लांब अंतरावर असुन येथिल नागरीकांना
आरोग्य विषयक सुविधा प्राप्त करण्याकरिता नांदेड, आदिलाबाद, यवतमाळ अशा ठीकाणी जाण्या शिवाय दुसरा कोणताच मार्ग नसतो
अशा परिस्थितीत अत्यवस्त रुग्णाला योग्य ठीकाणी नेत असतांना अनेक वेळा जिव गमवावा लागतो, तर कधी कधी लहान
उपचारा करिता दिवसभर प्रवास करुन उपचार करुन घ्यावा लागतो हि समस्या पाहता किनवट येथिल सुंदर मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल चे डॉ वसंत बामने व त्यांचे बंधु बालाजी बामने यांनी नांदेड च्या प्रसिध्द डॉ अजित काब्दे व त्यांच्या
समुहाला किनवट येथे आठवड्यातुन एकदा सुंदर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात भेट देण्यासाठी विनंती करुन त्यांना रुग्णसेवा देण्याकरिता तयार केल्याने त्या प्रसिध्द डॉक्टरांनी आज पासुन
किनवट येथे रुग्णसेवा देण्यास प्रारंभ केल्याने त्या निमित्त सुंदर हॉस्पिटल येथे आयोजित कार्यक्रमात सर्व डॉक्टरांचा व प्रशासकीय अधिका-यांचा, किनवट शहरातील मान्यवरांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला.
अनेक प्रयत्न करत आहोत कि किनवट तालुक्यात आरोग्य सुविधा सुधारावी तर लवकरच १०० बेडचे शासकीय रुग्णालय व्हावे यासाठी ही
येथिल लोकप्रतिनिधी व प्रशासनिक अधिकारी प्रयत्नशिल आहेत ते झाल्यास निच्छितच जनतेला लाभ होईल तर खाजगी व्यवसायीकांनी हि गेल्या ५ वर्षात किनवट करीता चांगल्या
आरोग्य सुविधा पुरवल्या आहेत तर प्रा.किशनराव किनवटकर यांनी नांदेड येथुन आलेल्या डॉक्टरांच्या समुहाचे स्वागत केले व त्यांनी किनवट मध्ये रुग्नसेवा देत असल्याबाबत आभार व्यक्त केला.
नांदेड येथिल प्रसिध्द डॉक्टर डॉ अजित काब्दे, डॉ पंकज राठी, चेतन्य इरावार,
तहसिलदार उत्तम कागणे, पोलिस निरिक्षक मारोती थोरात, डॉ उत्तम मोरे, भगवान हुरदुके,
शिवसेना ता.प्रमुख बालाजी मुरकुटे, माजी जि.प सदस्य बंडु नाईक, माजी नगराध्यक्ष के.मुर्ती, इसाखान, प्रा.किशनराव किनवटकर, विभिषण पाळवदे, पवार गुरु स्वामी,
योगगुरु अखिल खान, प्रेमसिंग जाधव, कचरु जोशी, पांडुरंग राठोड, शेख मझर, रामराव जाधव,
डॉ सोरटे, डॉ सुर्यवंशी, डॉ चिन्नावार, डॉ बालाजी तेलंग, डॉ पोहरकर, डॉ अकोले, स्वागत आयनेनीवार, कपिल रेड्डी, नाना भालेराव, पत्रकार
शकिल बडगुजर, मलिक चव्हाण, प्रमोद पोहरकर, नसीर तिगाले, प्रशांत वाठोरे, यांची उपस्थिती होती तर कार्यक्रम यशस्वीतेकरिता
महेश कनकावार, राजु सुरोशे, बालाजी बामने, पमा शेळके, गोविंद धुर्वे, कपिल मेश्राम, कश कनाके,
अशोक कनाके, आत्माराम जाधव, राम राठोड, योगेश जाधव, बालाजी बेले, पंकज हुल्काने, बालाजी पतंगे यांनी कठोर परिश्रम घेतले