Ticker

6/recent/ticker-posts

मांडवी शिरपुर मध्यम प्रकल्पाच्या कॅनाल मध्ये पाणी सोडणे बंद करून पाण्याचा गैरव्यवहार करणारयावर कार्यवाही करावी अशी मागणी शिवसेना माजी तालुका प्रमुख अविनाश चव्हाण व इंदल राठोड यांनी केली आहे


मांडवी प्रतिनिधी
 शिरपुर मध्यम प्रकल्पाच्या कॅनाल मध्ये पाणी सोडणे बंद करून पाण्याचा गैरव्यवहार 

करणारयावर कार्यवाही करावी अशी मागणी शिवसेना माजी तालुका प्रमुख अविनाश चव्हाण व इंदल राठोड यांनी केली आहे. 
    

  उन्हाची तीव्रता जशी जशी वाढत जात आहे तसे पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली शिरपूर 

मध्यम प्रकल्पाच्या राखीव पाणी साठयातून कॅनाल मध्ये पाणी सोडण्याचा प्रताप येथील कर्मचारयांकडुन केला जात आहे. 

सद्या रबी हंगाम संपला असुन शेतकरयांना पाण्याची गरज नसताना राखीव पाणी साठयातून 

कॅनाल मध्ये पाणी सोडण्यात येते आहे.

 पाण्याचा विसर्ग कॅनाल मधुन रात्र दिवस चालू आहे. 

तेलगांना भागातील शेतकरयांकडून पैसे घेऊन पाणी सोडण्यात येते असल्याचा आरोप चव्हाण व राठोड यांनी केला आहे. 
 

तेव्हा कॅनाल मध्ये पाणी सोडणे बंद करून  संबंधित कर्मचारयांवर कार्यवाही करावी अन्यथा 

उपोषणाचा मार्ग अवलंब केला जाईल असा इशारा दिला आहे.