Ticker

6/recent/ticker-posts

कार्यालयीन अधिक्षक व स्वच्छता निरिक्षक चंद्रकांत दुधारे यांची शिवा क्यातमवार यांच्या विरोधात तक्रार


कार्यालयीन अधिक्षक व स्वच्छता निरिक्षक चंद्रकांत दुधारे यांची शिवा क्यातमवार  यांच्या विरोधात तक्रार 



ता. प्र.किनवट:-
किनवट नगर परिषदेचे कार्यालयीन अधिक्षक  व स्वच्छता निरिक्षक चंद्रकांत दुधारे यांनी  नगरसेवीका श्रीमती अनिता क्यातमवार  यांचे पती शिवा क्यातमवार यांच्या हे

 नियमबाह्य कामे करण्या करिता दबाव टाकत असुन त्याकरीता मानसिक त्रास देत असल्याची तक्रार मा.मुख्याधिकारी एन. सुंकेवार यांच्याकडे  केली आहे .


वार्ड क्र.३मधुन निवडुन आलेल्या नगरसेवीका श्रीमती अनिता क्यातमवार यांचे पती शिवा क्यातमवार हे नियमबाह्य कामे करण्यास दबाव आणत आहेत 

त्यांचा बंदोबस्त करा अन्यथा लेखणी बंद आदोंलन  

असे पत्रव्यवहार प्रभारी कार्यालयीन अधिक्षक व स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे यांनी मुख्याधिकारी नगर परिषद यांच्याकडे सादर केल्याने शहरात चर्चेला उधान आले आहे 

दि.१४ मार्च रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशाला धुडकाऊन  काही दिवसापुर्वी एका व्यक्तीचे अपघाती निधन झाले त्यांचे १०मुळ प्रमाणपत्र द्या

 अशी मागणी श्रीमती  क्यातमवार यांचे पती शिवा क्यातमवार का. अ. सी. दुधारे यांना या बाबत दबाव आणत होते .


महिला आरक्षणावर एखादी महिला प्रतीनिधी निवडुण येते मात्र त्यांचा व्यवहार हे त्यांचे पतीच पाहतात एकीकडे शासन महिला सक्षमीकरणासाठी लाखों करोडो रुपये खर्च करते 

मात्र प्रत्यक्षात त्याची अमलबजावणी होताना दिसून येत नाही यामुळे नगर परिषदेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे या प्रकरणी 

मुख्याधिकारी व वरिष्ठ आधिकारी काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
या प्रकरणी न.प. कर्मचारी अझहर अली

 अनिल बिराजदार, प्रशांत कुमरे, रमेश नेमान्नीवार, विनोद पवार यांच्यासह विविध कर्मचाऱ्यांनी क्यातमवार यांना

  समजुत घालण्याचा प्रयत्न केला पंरतु ते कोणाचेही ऐकुण घेण्याच्या मनस्थितीत नव्हते .