Ticker

6/recent/ticker-posts

इन्स्टंट कमांडर गर्दीच्या ठिकाणी धडकले ; थेट तपासणी, विनामास्क फिरणाराकडून केला दंड वसूल


इन्स्टंट कमांडर गर्दीच्या ठिकाणी धडकले ; थेट तपासणी, विनामास्क फिरणाराकडून केला दंड वसूल

किनवट : तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असतांना स्वैरपणे फिरणाऱ्यांच्या मुसक्या 

आवळण्यासाठी इन्स्टंट कमांडर तथा तहसिलदार आरोग्य पथकासह शहरातील बसस्थानक, चौकासह गर्दीच्या ठिकाणी धडकले. 

काहींची थेट जाग्यावर केली तपासणी ; विनामास्क फिरणाराकडू केला दंड वसूल.
     

     जिल्ह्यात कोविडच्या दुसऱ्या फेरीत बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी कडक निर्बंध लावले आहेत.

 परंतु काही जण आदेशाचं उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी व बाजारात गर्दी करीत आहेत. बेफिकीर विनामास्क फिरत आहेत.

 साखळी तोडण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार 

यांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्टंट कमांडर तथा तहसिलदार उत्तम कागणे आपल्या लव्याजम्यासह शहरातील गर्दीच्या ठिकाणी फिरले. 

सोबतच्या आरोग्य पथकाने शहरात 5O  व बसस्थानकात 25 जणांची एँटिजेन टेस्ट घेतली.

 त्यात दोघेजण बाधित आढळले. विनामास्क फिरणाराकडून अडीच हजार रुपये दंड वसूल केला.
         
    पथकात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय मुरमुरे, डॉ.संतोष  गुंटापेल्लीवार, डॉ. दीपक राऊत, प्रकाश शिरसाठ, प्रदीप गायकवाड, 

शैलेश गावंडे, पांडे, पोलिस  सचिन पाटील, जगदिश पारधे किशोर चव्हाण, नगर परिषदेचे राजु पिल्लेवार, रजकुमार संकपेल्लीवार 

यांचा समावेश होता. घराबाहेर पडू नका , वारंवार साबणाने स्वच्छ हात धुवावे अथवा सॅनिटायझरचा वापर करावा 

तोंडाला मास्क बांधावे , या त्रिसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात आले.