Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड – कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेवून लॉकडाउन करण्यात आले. दरम्यान शिख समाजाच्या हल्लाबोल कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली


 Nasir Tagale:  नांदेड – कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेवून लॉकडाउन करण्यात आले. दरम्यान शिख समाजाच्या हल्लाबोल कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली.

 दरम्यान काही संतप्त शिख तरुणांनी सोमवार (ता.२९) रोजी विनापरवानगी हल्लाबोल मिरवणूक काढून पोलिसांच्या गाड्यावर तुफान दगडफेक केली. 

यात वरिष्ठ पोलीसांच्या गाड्यांची प्रचंड नासधूस करण्यात आली

रस्त्यावर लावण्यात आलेले बॅरिकेट तोडून टाकण्यात आले.
 हातात तलवारी घेवून दहशत पसरवण्यात आल्याचे माहिती देण्यात आली. पोलीस अधिकऱ्यांच्या गाड्याची हवा देखील सोडण्यात आली.

 या तुफान दगडफेकीत स्वतः पोलीस अधिक्षक यांच्यासह अतिरिक्त पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, 

यासह अन्य अधिकारी थोडक्यात बचावले असले तरी सात आठ पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त आहे

दरम्यान पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी घटना स्थळी पहानी केली आसून सद्या धरपकडची सत्र पोलीसांनी सुरु केले आहे.

 दरम्यान एलसिबी प्रमुख पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर हे घटना स्थळी तळ ठोकून आसल्याची माहिती आहे