Ticker

6/recent/ticker-posts

गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी आज काढले नवीन आदेश


गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर  यांनी आज काढले नवीन आदेश



नांदेड जिल्ह्यात कोविड 19 रुग्णांची संख्या वाढत असल्याने सदर विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदी प्रमाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी प्रतिबंधक उपाय म्हणून आदेश निर्गमित केले आहे.


त्यानुसार धार्मिक/सांस्कृतिक सभागृहात/ सार्वजनिक व वैयक्तिक/ प्रार्थनास्थळे/ समारंभासाठी लोकांची covid-19 रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निश्चित केलेले नियम व अटींचे उल्लंघन होऊ नये 

तसेच सदर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजनेचा एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यातील धार्मिक/सांस्कृतिक/ वैयक्तिक/ प्रार्थनास्थळ/ लग्न समारंभाच्या ठिकाणी खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून उपयोजना करण्यात यावी.


1) एका वेळेस धार्मिक /सांस्कृतिक सभागृहात /सार्वजनिक व वैयक्तिक प्रार्थनास्थळे /समारंभाच्या ठिकाणी/ मंगल कार्यालय मधील कर्मचारी व लग्नासाठी उपस्थित एकूण सर्व व्यक्तींची संख्या 50 पेक्षा जास्त असणार नाही.

2) सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे 


3)धार्मिक/ सांस्कृतिक सभागृहात/ सार्वजनिक व वैयक्तिक/ प्रार्थनास्थळे/ समारंभाच्या प्रवेशापूर्वी हँडवॉश सानिटीझर चा वापर करणे तसेच थर्मल स्क्रीनिंग द्वारे प्रत्येक व्यक्तीची तपासणी करूनच प्रवेश देणे.


4) सदर ठिकाणी सर्वांच्या चेहऱ्यावर मास्क असणे व सामाजिक अंतराचे पालन करणे. 5) मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तू, ठिकाणाचे वेळोवेळी ती नेहमीच निर्जंतुकीकरण करणे.

6) शासकीय कार्यालयासमोर उपोषण/ मोर्चे/ धरणे /आंदोलने इत्यादी प्रतिबंध असेल सदर कार्यक्रम प्रतिनिधिक स्वरुपात करण्यात यावे 2 किंवा 3 व्यक्तींनी एकत्र येऊन निवेदन सादर करावे.

7)सदर धार्मिक/ सांस्कृतिक सभागृहात/ सार्वजनिक/ प्रार्थनास्थळे/ समारंभ विहित कालावधीत करणे. मुबलक प्रमाणात सॅनिटायझर साठा असावा.

8) कोणताही आजारी व्यक्ती धार्मिक/ सांस्कृतिक/ सार्वजनिक प्रार्थनास्थळे/ समारंभास येणार नाही अथवा त्यांना प्रवेश देऊ नये.

9) धार्मिक /सांस्कृतिक सभागृहात/ सार्वजनिक /प्रार्थनास्थळे समारंभाच्या ठिकाणी 55 वर्षावरील नागरिक ज्यांना मधुमेह' उच्च रक्तदाब आणि इतर अनेक आजार अशा व्यक्ती,  गरोदर माता,लहान मुलांना शक्यतो प्रवेश टाळावा.

10) समारंभाला येणाऱ्या लोकांची यादी इन्सिडेंट कमांडर यांनी सादर करावी. सदर यादी समारंभाच्या अगोदर सादर करावी व त्यामध्ये समारंभाला येणाऱ्या लोकांचे मोबाईल क्रमांक व पत्ते असणे आवश्यक राहील 

11) समारंभाच्या आवारात,  थुकण्यास मनाई  करण्यात यावी.

12) नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क लावले नसल्यास प्रथमता 500 रुपये दंड आकारण्यात येईल व तदनंतरच्या उल्लंघणास लागणार 500 रुपये दंड व फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल.

13) अस्थपणा दुकाने यांनी उक्त नियमांचे पालन नाही केल्यास प्रथमत:5000 हजार रुपये थंड व दुसऱ्यांना नियमाचा भंग केल्यास 5 दिवसांसाठी दुकान सील. 

पाच हजार रुपये दंड आणि तिसऱ्यांदा नियमाचे उलनघन केल्यास सदर आस्थापना दुकान सील करून कायमचे परवाना रद्द करण्यात येईल.