आदीलाबाद -नांदेड इंटरसिटी पुन्हा प्रवाशांच्या सेवेत ; खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
------------------------------
नांदेड/हिंगोली : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली नांदेड-किनवट -आदीलाबाद इंटरसिटी एक्सप्रेस खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.
दक्षिण मध्य रेल्वे व्यवस्थापक गजानन मल्ल्या व नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपींदर सिगं यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या मागणीस दुजोरा दिला आहे.
दि.१ एप्रिल पासून ही गाडी मुदखेड,भोकर,हदगाव रोड, ,हिमायतनगर, सहस्रकुंड,बोधडी,किनवट आणि आदीलाबाद यादरम्यान धावणार आहे .
यामुळे हिंगोली मतदारसंघातील किनवट, माहूर ,मांडवी या भागातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच सार्वजनिक दळणवळण व्यवस्था बंद करण्यात आली होती देशाची लाईफलाईन असलेली रेल्वे सेवा सुद्धा यामुळे प्रभावित झाली होती.
तब्बल सहा-सात महिन्यानंतर सर्व सेवा पूर्वपदावर येत असताना देशाच्या प्रादेशिक भागातील वाहतूक व दळणवळण व्यवस्था सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती.
दक्षिण मध्य रेल्वे च्या नांदेड विभागातून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.
यातील नांदेड-किनवट -आदीलाबाद इंटरसिटी एक्सप्रेस असून ही गाडी हिंगोली लोकसभा मतदार संघातील किनवट ,माहूर तालुक्याशी जोडली गेलेली आहे.
त्यामुळे ही इंटरसिटी एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याची मागणी झाल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी याबाबत दक्षिण मध्य रेल्वे
व्यवस्थापक गजानन मल्ल्या व नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपींदर सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून मागणी केली
व वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट सुद्धा घेतली त्यानंतर रेल्वे ने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ मागणी मंजूर केली.
१ एप्रिल पासून ही रेल्वे सेवा पूर्ववत सुरू होणार आहे.
आदीलाबाद,किनवट, बोधडी ,सहस्त्रकुंड, हिमायतनगर,हदगाव रोड,भोकर,मुदखेड या स्थानकावर ही गाडी थांबणार आहे.
आदीलाबाद येथील सकाळी 8 वाजता निघून दुपारी सकाळी 11:55 वाजता नांदेड येथे पोहचेल तर दुपारी 3 वाजता नांदेड येथून निघून सायंकाळी 6:55 वाजता आदीलाबाद येथे पोहचेल.
या गाडीमुळे बंद झालेली दळणवळण सेवा पूर्ववत होण्यास मोठी मदत होणार आहे.
हिंगोली लोकसभा मतदार संघातील किनवट,माहूर तालुके या गाडीमुळे खूप मोठ्या प्रमाणत प्रभावित झालेले आहेत.
आदीलाबाद आणि नांदेड कडे जाणारे नौकरदार आणि व्यापारी वर्गांना याचा लाभ होणार आहे.