अखिल भारतीय किसान मजदूर सभा व दिव्यांग वृध्द निराधार, आदिवासी जंगल जमीन हक्क संघर्ष समितीने नांदेड
जिल्ह्यतजिल्हाधिकारी, ऊपजिल्हाधिकारी,सर्व तहसिल कार्यालय येथे २३ मार्च २१ च्या धरणे आंदोलनात मोजक्याच कार्यकर्त्यांनी नियमाचे तंतोतंत पालन करून सहभागी व्हावे असे आवाहन चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केले*
नांदेड भूमिहीन दिव्यांग, शेतमजूर, गायराणपट्टे धारक शेतमजूर यांच्या जमीन हक्काच्या लढाईसाठी दि २३ मार्च २१ रोजी काँ. अशोक घायाळे, चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व
तहसील कार्यालयावर एका दिवसाचे धरणे आंदोलन करोणा नियमाचे पालन करूण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचे निवेदन तहसिलदार साहेब, नायगाव, बिलोली,
लोहा,कंधार,मुखेड,लोहा,अर्धापुर,हदगाव,माहुर,किनवट,तालुक्यातील तहसिलदार साहेब यांना जमीन हक्कासाठी एक दिवसाचे धरणेकरण्यात
येणार असल्याचे निवेदन मा चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या शिष्टमंडळासहित सादर केले बाकि तालुक्यातील निवेदन सादर करणे चालु आहे.
एका दिवसाचे धरणे आंदोलन करून शासन प्रशासन यांचे लक्ष वेधून शासनाने जंगल जमीन, गायरान जमीन, मसुुरा जमीन, परमपुक जमीन, सिलिंग जमिन भूमिहीन दिव्यांग, शेतमजूर, गायराण पट्टेधारक बांधवांच्या नावावर दिले
तर त्या दिव्यांगाना मान सन्मान व सर्व सामान्य जनतेसाठी त्यांना सन्मानाने त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांना जगवतील व शासनास महसुल जमा होऊन शासनाच्या तिजोरीत वाढ होईल
म्हणून अखिल भारतीय किसान मजदूर सभा व आदिवासी हक्क संघर्ष समिती, दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र यांच्या संयुक्त कृति समितीने आयोजित केलेल्या २३ मार्च २१
रोजी एका दिवसाच्या धरणे आंदोलन कोव्हिड
संकटकाळी शासनाच्या नियमाचे तंतोतंत पालन करून मोजक्याच कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन शासन प्रशासन यांचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.
अखिल भारतीय किसान मजदूर सभेचे केंद्रीय सचिव अशोक घायाळे,चंपतराव डाकोंरे रंगनाथ भालेराव,
रामकिसन कांबळे, सोपान नरहरे, शिवाजी चव्हाण सर, बळीराम, गऊलवार राजु, कांबळे, जयसिंगराव, बालाजी होनपारखे, प्रेयसिंग चव्हाण, राजु