Ticker

6/recent/ticker-posts

लोहा तहसिलदार साहेब यांना अखिल भारतीय किसान मजदूर सभा व दिव्यांग वृध्द,निराधार यांच्या संयुक्तपणे दि २३ मार्च २१ रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदन चंपतराव डाकोरे पाटिल शिष्टमंडळाने दिला ईशारा


लोहा तहसिलदार साहेब यांना अखिल भारतीय किसान मजदूर सभा व दिव्यांग वृध्द,निराधार  यांच्या संयुक्तपणे दि २३ मार्च २१ रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदन चंपतराव डाकोरे पाटिल  शिष्टमंडळाने दिला ईशारा

लोहा :- भूमिहीन दिव्यांग, शेतमजूर, गायराणपट्टे धारक शेतमजूर यांच्या जमीन हक्काच्या लढाईसाठी दि २३ मार्च २१ रोजी अखिल 

भारतीय किसान मजदूर सभा केंद्रीय सचिव अशोक घायाळे व दिव्यांग वृध्द निराधार मिञ 

मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली नादेड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, 

उपजिल्हाधिकारी, तहसिल कार्यालय येथे एका दिवसाचे धरणे आंदोलन  खालील प्रश्नासाठी आयोजित करण्यात आले 

त्यांचाच एक भाग म्हणून संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल व शिष्टमंडळ 

लोहा तहसिलदार साहेब व पोलिस निरीक्षक साहेब यांची भेट घेऊन  निवेदन देण्यात आले.
 
*मागण्या* :-

 १)  शासनाने जंगल जमीन, गायरान जमीन, मसुुरा जमीन, परमपुक जमीन, सिलिंग जमिन भूमिहीन दिव्यांग, शेतमजूर, गायराण पट्टेधारक बांधवांच्या नावावर देण्यात यावे.

२) दिव्यांगाना स्थानिक स्वराज्य  संस्थेअंतर्गत मिळणारा दिव्यांग पाच टक्के निधी  तात्काळ वाटप करण्यात यावा. 

३) ग्रामीण भागातील गोरगरिबांना तिनशे दिवसाचा रोजगार तात्काळ देण्यात यावा


४) दिव्यांग वृध्द निराधार यांना दरमहा मिळणार्या वेतनात दोनवेळा दुधाचा खर्च भागत नाही त्या एक हजार मध्ये कसे 

जीवन जगतील त्यासाठी महागाईच्या काळात दरमहा दहा हजार रुपये दिले तर, त्या दिव्यांगाना मान सन्मान व सर्व सामान्य जनतेसाठी त्यांना सन्मानाने त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांना जगवतील त्यांची हालअपेष्ठा थांबतील ते वेळेवर देण्यात यावे. 
   

    ईत्यादी मागण्या संदर्भात शासन,प्रशासन यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी कोव्हिडचे शासनाच्या नियमाचे पालन करून धरणे आंदोलन करण्याचा 


इशारा निवेदन अखिल भारतीय किसान मजदूर सभा व दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ 

महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर, ता ऊपअध्यक्ष शेख हानिफ, आनंदराव मोरे, शिवाजी पवार,

 सुरज कांबळे, लिंबटकर, विश्वनाथ केंद्रे, सटवाजी कांबळे, दळवे, संदिप यंरडे ईत्यादी कार्यक्रर्ते उपस्थित होते असे प्रसिद्ध देण्यात आले