Ticker

6/recent/ticker-posts

दिनांक २२ मार्च, बेलखोडे परिवारातील जेष्ठ सदस्य, श्री. भैय्याजी रामचंद्र बेलखोडे यांचा ७७ वा वाढदिवस किनवट येथे साने गुरूजी रूग्णालय परिवारात घरगुती वातावरणात साजरा


दिनांक २२ मार्च, बेलखोडे परिवारातील जेष्ठ सदस्य, श्री. भैय्याजी रामचंद्र बेलखोडे यांचा ७७ वा वाढदिवस किनवट येथे साने गुरूजी रूग्णालय परिवारात घरगुती वातावरणात साजरा केला.

 वाढदिवसानिमीत्त नव्याने बांधकाम सुरू असलेल्या “साने गुरूजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

सोबतच त्यांनी ५० हजार रूपयांची देणगीही संस्थेच्या नावे जमा केली.

 ही देणगी  रूग्णालय परिसरात रूग्णांच्या नातेवाईक व सोबत असणाऱ्या व्यक्तींसाठी निवास व्यवस्था व्हावी म्हणुन बांधण्यात येणाऱ्या  
नियोजीत  “नातेवाईकालय” (ज्याला रूढ अर्थाने धर्मशाळा म्हणतात.) च्या बांधकामासाठी देण्यात आलेली आहे. 

डॉ. अशोक बेलखोडे यांच्या सेवाव्रती जीवनकार्याचा एक महत्वाचा टप्पा म्हणुन हे भव्य रूग्णालय उभे राहत असून त्यांच्या रूग्णसेवेच्या सेवाव्रती कार्याला डॉ. अशोक यांचे सर्व नातेवाईक मिळून

  रूग्णांच्या नातेवाईकांची सेवा घडावी या उद्देशाने हे नातेवाईकालय उभे करीत आहेत. जणू संपूर्ण बेलखोडे कुटुंब व सर्व नातेवाईक, 

आप्तेष्ट या सेवाकार्यात सहभागी होत आहेत. या प्रकल्पाचे डिजाईन अभियंता संकेत आंबटकर (डॉ. अशोक यांचा भाचा)

 यांनी पुण्यातील श्री. गौतम व अपर्णा मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली विनामुल्य तयार केले असून त्यासाठी ४५ ते ५० लाख रूपये निधी उभा करण्याची सर्वांनी तयारी दर्शविली आहे.
 

आतापर्यंत या प्रकल्पास बेलखोडे यांचे साडू श्री. यशवंत हांडे नागपूर,  यांचे पन्नास हजार त्यांचे पुत्र स्वप्नील यशवंत हांडे, बोस्टन अमेरीका यांनी तीन लाख, डॉ. विक्रम बेलखोडे,

 दंतशल्य चिकीत्सक, वर्धा यांनी एकावन्न हजार रूपये (दिनांक २५ मार्च, वाढदिवसानिमीत्त) तसेच सौ. शोभा मुरलीधर बेलखोडे यांनी त्यांच्या वडीलांच्या (स्व. नारायणराव घाटोळे, पांढुर्णा म.प्र.) 

स्मृतीप्रित्यर्थ रूपये एक लाख देणगी देऊन हा प्रकल्प आकारास येण्यासाठी दमदार पाऊल उचलले आहे. 


भारत जोडो युवा अकादमीच्या सर्व विश्वस्त बेलखोडे परिवार व नातेवाईक या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करीत आहे.