किनवट तालुक्यातील पाणीपुरवठ्याचा खंडीत विद्युत पुरवठा तात्काळ सुरु करावा
प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे मा. सहाय्यक जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.*l
किननट प्रतिनिधी/ मारोती देवकते.
मा, जिल्हाधिकारी साहेबांनी पाणीपुरवठा च्या विद्युत पुरवठा खंडीत न करण्याचे आदेश देऊन सुध्दा मौजे पाटोदा (बु.)
व किनवट तालुक्यातील बर्याच गावातील पाणीपुरवठाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला.
परंतु।
पाणीपुरवठा चे विद्युत बिल लाखो रुपये होईपर्यंत ग्रामपंचायत चे आधिकारी झोपी गेले होते की काय, ❓
या संदर्भात आपणास मा. गटविकास आधिकारी व उप अभियंता (m.e.c.b.) यांना वेळोवेळी परिस्थिती चे गांभीर्य सांगुन खंडीत विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करण्याविषयी विनंती करण्यात आली.
व आपण स्वतः जातीने लक्ष घालून परीस्थिती चे लक्षात घेऊन संबंधित महामंडळाच्या अधिकार्यांना तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा आदेश दिले.
परंतु आजपर्यंत विद्युत पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही.
१५ दिवसापासून पाणीपुरवठ्याचा विद्युत वीजपुरवठा खंडित केल्यामुळे गावातील नागरीकांना आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे।
आजपर्यंत गावातील लोकांनी भरणा केलेल्या पैशाचे ग्रामपंचायतीच्या अधिकारी व पदाधिकारी यांनी काय केले.
याचा त्यांच्याकडून हिशोब घेण्यात यावा. व विद्युत महामंडळाच्या अधिकार्यांनी लाखो रुपये थकित बिल होईपर्यंत काय केले।
या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. व संबंधित दोषी लोकांवर कार्यवाही करण्यात यावी.
अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल, असे मागणी पर निवेदन मा, सहायक जिल्हाधिकारी साहेब किनवट यांना देण्यात आले.
त्या वेळी उपस्थित. प्रहार जनशक्ती पक्ष तालुका प्रमुख मा, मधुकर भाऊ शेंडे,
उपप्रमुख विजय भाऊ टेळके,ता.सचिव पप्पू भाऊ सातपुते,ता.आध्यक्ष अॅटोयुनियन शे. अल्बक्स शे. युसुफ,
ता. युवा सह सचिव मारोती भाऊ देवकते, सामाजिक कार्यकर्ते, वेनुभाऊ निलावार, व शिवराज सल्कमवाड,