Ticker

6/recent/ticker-posts

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला दि.३ पासून प्रारंभ झाला असून दि. २१ मार्च पर्यंत पालकांनी अर्ज भरावेत -गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने


सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला दि.३ पासून प्रारंभ झाला 

असून दि. २१ मार्च पर्यंत पालकांनी अर्ज भरावेत  -गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने 


किनवट : सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला दि.३ मार्च पासून प्रारंभ झाला 

असून दि. २१ मार्च पर्यंत पालकांनी अर्ज भरावेत , असे आवाहन गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी केले.
      

     याबाबत सविस्तर वृत्त असे की , बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम , २०० ९ मधील कलम १२ ( १ ) ( सी ) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील मुला / मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे .

 दरवर्षी प्रमाणे सन २०२१-२२ या वर्षाची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत असून तालुक्यातील सर्व संबंधित शाळांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. 

तसेच  दि . ०३/०३/२०२१ ते दि. २१/०३/२०२१ या कालावधीमध्ये पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात करावी. 

कोणीही लाभार्थी यापासून वंचित राहू नये, 
असे शिक्षण संचालनालय, पुणेचे शिक्षण संचालक 

( प्राथमिक )  द.गो.जगताप यानी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहिर केल्याचे गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी कळविले केले.