लॉकडाऊन आणि हातावर पोट असणाऱ्यांची कैफियत
(ता. प्र. किनवट)
लॉकडाऊन वृतांत :
एकीकडे कोव्हीड १९साठी जिल्हाधिकाऱ्यांचे लॉकडाऊन आणि दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्यांची दुर्दशा हे डोळ्यांनी बघवत नाही
जिल्हाधिकारी आदेशा प्रमाणे २४ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषीत करण्यात आले
त्याच आदेशाचे पालन म्हणुन नांदेड पोलीस आपले कर्तव्य बजावत आहे
पंरतु या लॉकडाऊन दरम्यान जे हातावर पोट असणारे छोटे व्यापारी आहे जसे की फळ विक्रेते, हमाल,रीक्षावाले, लाकडाची मोळी विकणारे,
बटाने-खरमुरे विकणारे, चहा टपरीवाले, भंगार विकणारे, ऐवढेच काय तर भिक मागणारे मुल भीक्षेकरी सुध्दा
या परीस्थीत भीक कसे बसे मागतांना दिसत आहे आणि किनवट मध्ये बाहेर जिल्ह्यातुन उदरनिर्वाहासाठी नुकतेच मीनाबाजार आले
पंरतु त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनीं संवाद साधल असता खुप बिकट परीस्थीती चालु आहे
आमचा परिवार खुप मोठा आहे आम्ही लॉकडाऊनच्या आधी फक्त चार दिवस मिनाबाजार सुरु केला
पण सर्व आता ठप्प झाले पोटाचा प्रश्न अवघड झाला बघुया आता ४ एप्रिल नंतर प्रार्थना करतो की लवकरच सर्व काही सुरळीत होईल