Ticker

6/recent/ticker-posts

किनवट दि १३ सुमारे ५ कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेली नविन तहसिल कार्यालयाची प्रशासकीय इमारत २ वर्षा पासुन उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असल्याने नागरीकांचे हाल होत आहेत


किनवट दि १३ सुमारे ५ कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेली नविन तहसिल कार्यालयाची प्रशासकीय इमारत २ वर्षा पासुन उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असल्याने नागरीकांचे हाल होत आहेत, तालुक्याचे मुख्यालय म्हणजे 

त्या तालुक्याचे तहसिल कार्यालय हे असते त्यासाठी तालुक्यातील ग्रामिण भागातुन शेतकरी, विद्यार्थी, नागरीक हे विविध प्रशासकीय कामा निमित्त 

येतात परंतु किनवट शहरातील नव्याने उभारण्यात आलेल्या तहसिल कार्यालयाचे उद्घाटन झाले नसल्याने नागरीकांना अतोनात त्रास होत आहे 

त्या विरुध्द कॉग्रेस सेवादल चे माजी जिल्हाध्यक्ष प्रा.किशनराव किनवटकर यांनी उपोषनाचा इशारा दिला आहे.
    

   यावेळी बोलतांना प्रा.किनवटकर यांनी सागितले कि, तहसिल कार्यालय व तहसिल कार्यालयाशी निगडीत तत्सम सेवा ह्या सध्या कार्यरत असलेल्या तहसिल कार्यालयात उपलब्ध नसल्याने नागरीकांचे अतोनात हाल होत आहेत 

सध्या आय.टी.आय येथे असलेल्या तहसिल कार्यालया जवळ सेतु सुविधा केंद्र, झेरॉक्स सेंटर, बॉड रायटर, टायपिंग सेंटर, 

यांच्या सोबतच ग्रामीण भागातुन आलेल्या नागरीकांना चहापान करण्याकरिता साधे कॅन्टीन देखिल उपलब्ध नाहीत तर शहरातुन सध्या कार्यरत असलेल्या तहसिल कार्यालयात ये-जा करण्याकरिता अबालवृध्दांना अनेक त्रास सहन करावे लागत आहे, 

सुमारे ५ किमी लांब असल्याने एका ट्रीप चे ऍटॉ चालक ३० ते ५० रुपये आकारत आहेत 

एवढे पैसे खर्च करुन तेथे गेल्या नंतर कर्मचारी व अधिकारी उपस्थित राहिल याची शास्वती नाही. 

तर त्या ठीकाणी दलालांचा सुळसुळात असल्याने नागरीकांचे कामे सहजासहजी होत नाही.
    
   यामुळे प्रशासनाने उभारलेल्या किनवट शहरातील नविन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते 

३१ मार्च पुर्वी करुन येथे स्थलांतर करावे अन्यथा प्रशासना विरुध्द आपण उपोषणाला बसणार असल्याचे ही प्रा.किशनराव किनवट यांनी सांगितले आहे.