Ticker

6/recent/ticker-posts

अमृत आहार योजनेचे वाटप महिला बचत गटांना दिल्याने महिला व्यवसाईक दृष्ट्या सक्षम.पण ही योजना महिला बचत गटांकडून काढून घेण्यात यावी यासाठी काही जणांचे प्रयत्न


अमृत आहार योजनेचे वाटप महिला बचत गटांना दिल्याने महिला व्यवसाईक दृष्ट्या सक्षम.

पण ही योजना महिला बचत गटांकडून काढून घेण्यात यावी यासाठी काही जणांचे प्रयत्न

किनवट : सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ७ आॅक्टोंबर २००४ रोजी दिलेल्या आदेशामध्ये एकात्मीक बाल विकास प्रकल्प सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी सेविका मार्फत होणारा

 डाॅ. ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा पुरवठा हा स्थानिक महिला बचत गटांमार्फत सुरु करावा असा आदेश दिला होता. 

या आदेशाने महिला बचत गटांतील महिलांना हाताला काम मिळाले व सर्व महिला व्यवसायिक 

दृष्ट्या सक्षम झाल्यात व स्वताच्या पायावर उभ्या झाल्या यांमुळे या आदेशाचे बचत गटांकडुन व सर्व महिलांकडून आभार व्यक्त केले जात आहे.
       

  एकीकडे सर्व महिला या आदेशाचे स्वागत करत आहेत तर दुसरीकडे याच आदेशाला अंगणवाडी सेविका व सेविकेचे भाऊ विरोध करत आहे. 
अमृत आहार योजनेचे वाटप हे अंगणवाडी सेविकांकडेच राहावे यांसाठी अंगणवाडी सेविका व त्यांचे भाऊ मिळुन 

व काही पत्रकार लोकांना हाताशी धरून बचत गटांतील महिलांना मानसिक त्रास देत आहेत.
    

  जेंव्हापासून अमृत आहार योजनेचे वाटप हे महिला बचत गटांमार्फत करण्यात येत आहे 

तेव्हापासून अमृत आहार योजनेचे लाभार्थी अमृत आहार योजनेचा आहार हा अत्यंत उत्कृष्ट व उत्तम आहे अशा तोंडी व लेखी प्रतिक्रीया देत आहेत. 
तरीसुद्धा अंगणवाडी सेविका लाभार्थींना सांगतात की, आहार गटांमार्फत घेऊ नका अशी जोरजबरदस्ती करतात. 

तर अंगणवाडी सेविकांचे भाऊ काही पत्रकार लोकांना हाताशी धरून आमच्या विरुद्ध खोट्या बातम्या लावने

  बातमी मध्ये उत्कृष्ट आहार ला निक्रृष्ट आहार लिहीने व काही पत्रकार बांधव सुध्दा आहाराची प्रत्यक्ष तपासणी नकरता खोट्या 

बातम्या लाऊन महिला बचत गटांतील महिलांना मानसिक त्रास देत आहेत 

अशी माहिती महिला बचत गटांतील महिलांनी दिली.
           

      पत्रकारांशी बोलताना बचत गटांतील महिला म्हटले की, आम्हा महिलांना काहीतरी काम करुन सक्षम होण्याचा पर्याय मिळाला आहे 

पण या मानसिक त्रासामुळे आम्हाला काम करण्यात अडथळा येत आहे 

तरी आमची इच्छा आहे की पर्यवेक्षिकांनी व  सर्व पत्रकार बांधवांनी प्रत्यक्ष येऊन अंगणवाडीला भेट देऊन आहाराची तपासणी करून आहार उत्कृष्ट की निक्रृष्ठ आहे हे ठरवावे व आम्हाला या त्रासापासून मुक्त करावे.
           

     अंगणवाडी सेविका व  बचत गटांतील वाद चव्हाट्यावर असताना पर्यवेक्षिका नेमकं काय करत आहेत? 

तसेच अंगणवाडी सेविका यांचे भाऊ महिलांना मानसिक त्रास का देत आहेत? व त्यांचे काही पत्रकार मित्र खोट्या बातम्या का लावत आहेत? 

यामगचे नेमकं राजकारण काय? अशे प्रश्न सध्या सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण होत आहेत. 

या वादाचा निकाल नेमका काय लागेल यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.