महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ऊपमुख्यमंञी, विधानसभा अध्यक्ष, विरोधी पक्षनेते महोदय दिनदुळ्या दिव्याग वृध्द निराधार यांना अधिवेशनात न्याय देतील काय? संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर
दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ऊपमुख्यमंञी, विधानसभा अध्यक्ष,
विरोधी पक्षनेते यांना दिनदबुळ्या दिव्याःग, वृध्द निराधार यांच्या हक्काचे कायदे अधिवेशनात पास होतात त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आपणआदेशित करावे म्हणून
मा जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्या तर्फे डाकोरे पाटिल शिष्टमंडळ मा उपजिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्या सोबत चर्चा करून खालील मागण्याचे निवेदन दिले.
*प्रमुख मांगण्या
१) दिव्याग कायदा २०१६ च्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसभा, तालुका, जिल्हास्तरावर ग्रामसभा घेऊन माहिती द्यावी
२) सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिव्यांग निधी पाच टक्के ची अंमलबजावणी करणे
३) दिव्यांग वृध्द निराधार यांना दरमहा मिळणारे अनुदान दरमहा पाच हजार रूपये वाढ करून वेळेवर वाटप करावे
४) दिव्यांग व्यक्ती जीवंत असे पर्यत कायमस्वरूपी निवासी आश्रम उभारण्यात यावे
५) दिव्यांग विधवा, निराकार, भूमिहीन यांना पाच एकर शासकीय जमीन मिळणे.
६) दिव्यांगास विवाह प्रोत्साहन भत्ता एक लाख रूपये देण्यात यावा.
७) प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांची भवन उतरावे.
८) दिव्याग बांधवाना गावठाण जमीनीत घरकुल बांधुन दिव्यांगची वस्ती निर्माण करणे
९) दिव्यांगाच्या कल्याणासाठी स्वतंञ दिव्यांग विभाग,तालुका, जिल्हा,विभाग,मंञलय स्तरावर, विस्तार करावा.
१०) दिव्यागासाठी व्यवसाय करण्यासाठी बीज भांडवल व कर्जाचे प्रकरण ना मंजुर करणार्या अधिकारी यांना कार्यवाही करणे.
११) दिव्यांग पुनर्वसनाशी संबधित ग्रामपंचायत. तालुका जिल्हा पातळिवर सर्व समित्यांवर दिव्यांगाचे प्रतिनिधी देण्यात यावे.
१२) दिव्यांगास व्यवसाय करण्यासाठी बसस्टाँन्ड, रेल्वे स्टेशन शासकीय आँफिस अशा ठिकाणी जागा, गाळे मिळणे
१३) दिव्यांगाना शासकीय, खाजगी कंपनीत, सेवाभावी सस्थेत नोकरीत दहा टक्के राखीव आरक्षण देऊन पुर्ण अनुशेष भरावा.
१४) *दिव्यांगाना लघु ऊधोग उभारणीसाठी विशेष मोहीम आखावी व्यवसाय करण्यासाठी विनामुल्य स्टाईल साहित्य वाटप करावे*
१५) *दिव्यांगाच्या आँनलाईन तपासणीत खरे दिव्यांगाना न्याय द्यावा* चालिस टक्के पेक्षा कमी असलेल्या फेर तपासणी साठी जे जे हास्पिटल मुंबई येथे अपील केल्यानंतर SADM
प्रणाली द्वारे तपासणी केली जात होती .परंतु दि ३ आँक्टो. १८SADM प्रणाली बंद करून युनिक प्रणालीत तपासणी केली जात आहे.पण या प्रणालीत फेर अपिलाची नोंद नसल्याने खरे दिव्यांग वंचित राहात आहेत
१६) *दिव्यांगाना मारहाण अपमानवागणूक देणाऱ्यावर 2016 नुसार कलम 92बी 93 प्रमाणे आरोपी वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी*
17) *आमदार निधी*
पंधरा लाख दरवर्षी दिव्यांगाना स्थानिक मतदार संघात आमदार निधी २०१६ पासुन मिळत नाही
१8) *अंत्योदय राशन योजना*
दिव्यांग व्यक्तीला स्वतंत्र अंत्योदय राशन व राशन कार्ड देण्याची शासन तरतूद आहे.पण
त्याची अंमलबजावणी होत नाही.
मा. लोकप्रिय मुख्यमंत्री, ऊपमुख्यमंञी,विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेते मंञी साहेबानी वरील प्रश्न उपस्थित करून दिनदुबळ्याना न्याय द्यावा