Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक महिला दिनानिमित्त गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान


जागतिक महिला दिनानिमित्त गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान



किनवट : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गट शिक्षणाधिकारी कार्यालय,पं.स. 

किनवटच्या वतीने कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपापल्या क्षेत्रात स्वतःला झोकून देउन काम करणाऱ्या आरोग्य,

 शिक्षण, पोलिस, परिवहन, अंगणवाडी क्षेत्रातील १० कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
      

    कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका मांडतांना प्रास्ताविकातून गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने म्हणाले की, 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांच्या प्रेरणेतून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. किनवट या अतिदूर्गम, डोंगरी, 

आदिवासी तालुक्यात विविध क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या पुढील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान पुस्तके व पुष्पगुच्छ देउन करण्यात आला.


सामाजिक व शैक्षणिक : प्राचार्या शुभांगी प्रशांत ठमके ( आदिम कोलामांना अन्नधान्य कीट वाटप व जनजागृती ),


आरोग्य : पुजा अरविंद भवरे, त्रिशला पुंडलिक भंडारे ( परिचारिका, डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर , उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे अविरत सेवा ),
पोलिस : अनिता नागनाथ गज्जलवार (पोलिस ठाणे, किनवट ),


शिक्षण : रमणा मलय्या सच्चावार, शालिनी विठ्ठलराव सेलूकर ( घरघर सर्वेक्षण, ऑन लाईन व ऑफलाईन प्रभावी शिक्षण ),


परिवहन : स्वाती राजेश बल्लीडगेवार ( राज्य परिवहनच्या भांडार लिपीक म्हणून मानव विकास योजना मुलींना मोफत बस सुविधेच्या बसेसचं सुव्यवस्थापन ),

अंगणवाडी : उषा माधव पवार-ठाकरे ( मोहपूर अंगणवाडी क्र. 1 अंगणवाडी सेविका यांनी 

मियावाकी पद्धतीने ५०० वृक्ष लावून जगविले , सुयोग्य अमृत आहार योजना अंमलबजावणी )


जनजागृती : सत्यभामा मुंडे ( कोविड मदत शिबीरात उपस्थित राहून महिलांमध्ये जनजागृती केली )


स्वच्छता : उषा परसराम राठोड व त्रिगुणाबाई कागणे ( यांनी परिसर स्वच्छता ठेवली )
       

      यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड, ना. ना. पांचाळ, अशोक हमदे केंद्र प्रमुख रमेश राठोड, रामा ऊईके, बी.बी . डुमणे, बी. व्ही. थगणारे हे प्रमुख अतिथी उपस्थित होते. 

उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. राम बुसमवार यांनी आभार मानले.
          

   क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पार्पूण कार्यक्रमास प्रारंभ झाला. 

श्री बाबासाहेब मुखरे विद्यालय व सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक विद्यालयाच्या मुली व शिक्षिका कोविड - १९ च्या नियमांचे पालन करून उपस्थित होत्या.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ सहायक गिरीधर नैताम, एस.एन. ब्राह्मण, बालू कवडे , गोविंद बिच्चे, डी.के.नाईकवाड आदिंनी परिश्रम घेतले. याप्रसंगी सत्कारमूर्तींनी आपले विचार मांडले.