राज्यातील वीज ग्राहकांसाठी मोठी बातमी वीज बिल न भरणाऱ्या ग्रहकांचे वीज कनेक्शन कापले जाणार.
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच राज्य सरकारने राज्यातील वीज ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.
अधिवेशन काळात ऊर्जामंत्र्यांनी वीज कनेक्शन तोडण्याबाबत जी स्थगिती देण्यात आली होती.
ती मागे घेतली आहे. याचा अर्थ आता वीज बिल न भरणाऱ्या नागरिकांचे वीज कनेक्शन कापले जाणार आहे.
विधानसभेत २ मार्च २०२१ रोजी झालेल्या चर्चेत महावितरणाव्दारे वीज ग्राहकांची जोडणीबाबत अधिवेशन कालावधीत चर्चा होण्याच्या
आधीन राहून थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थगितीचे आश्वासन दिले आहे.
त्यानंतर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी हि स्थगिती उठवत असल्याचे सभागृहात सांगितले.
कोविड काळात लॉकडाऊन लागल्यानंतर या दरम्यान लोकांना भरमसाठ बिले आली होती.
लोकांना सरासरीवर आधारीत वीज देयके देण्यात आली होती. पण यामध्ये मोठ्या प्रमाणात बिलं आल्याने राज्यातील जनतेने आक्रोश व्यक्त केला होता.