Ticker

6/recent/ticker-posts

अंगणवाडी पर्यवेक्षिकेला गट विकास अधिकारी पदाचा पदभार सोपवून पंचायत समितीत जागतिक महिला दिन साजरा


अंगणवाडी पर्यवेक्षिकेला गट विकास अधिकारी पदाचा पदभार सोपवून पंचायत समितीत जागतिक महिला दिन साजरा

किनवट :  अंगणवाडी पर्यवेक्षिकेला गट विकास अधिकारी पदाचा पदभार सोपवून पंचायत समितीत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. 
      

    जागतिक  महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा बहुमान करण्याच्या उद्देशाने गटविकास अधिकारी सुभाष धनवे यांनी 

 बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या पर्येवेक्षिका वर्षा वाघमारे यांच्याकडे पंचायत समितीच्या गट 

विकास अधिकारी पदाचा पदभार सोपवून पुष्पगुच्छ देऊन सन्मानाने खूर्चित बसवून महिलेचा सन्मान केला. 
         

   अशा अनोख्या पद्धतीने पंचायत समिती कार्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी सुभाष धनवे, 

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, संदीप आगळे, विस्तार अधिकारी डी.आय. उडतेवार , विठ्ठल सिरमनवार, 

ग्राम विकास अधिकारी संतोष ताडेवार आदिंसह ग्रामसेविका व महिला कर्मचारी उपस्थित होत्या. 
       

   कार्यक्रमानंतर महिला व बालविकास प्रकल्प विभागाच्या पर्येंवेक्षिका वर्षा वाघमारे यांना प्रभारी बिडिओ म्हणून पदभार सोपविण्यात आला.

 त्यांनी आर्थिक व्यवहार वगळता सर्व कामे केली. 

महिलांचा सन्मान सोहळा अशा अनोख्या पद्धतीने केल्या बद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.