Ticker

6/recent/ticker-posts

किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प हा आर्थिक क्रांती घडवून आणणारा


किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प हा आर्थिक क्रांती घडवून आणणारा आहे. 

या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प क्रांतिकारक ठरणार आहे. 

असे मत किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपा नेते प्रफुल्ल राठोड यांनी व्यक्त केले.


दिनांक.21/03/2021 रविवार रोजी मांडवी येथे शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मिरा क्लिन फ्युल, गव्हाणे बायो फ्यूल व 

जयआनंद शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने Bio-CNG,Bio-PNG, सेंद्रिय खत निर्मिती कारखाना राजगड येथे लवकरच कार्यान्वित होत असून या अनुषंगाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन मांडवी येथे करण्यात आली. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल राठोड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून 

कुंदन पवार  गव्हाणे बायो फ्युल तथा जयआनंद शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विनायक गव्हाणे,बाबुसिंग नाईक, विनोद राठोड डॉ.प्रशांत राठोड  हे होते.


अध्यक्षीय समारोप करत असताना प्रफुल राठोड यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प  महत्वाचा असून शेतकऱ्यांच्या शेतामधील ओला कचरा ही विकला जाणार आहे

जो की शेतकरी जाळुन टाकत होता.त्याच बरोबर नेपियर गवत लागवडीतुन शेतकऱ्यांना एक एकर मध्ये  एक लाख निव्वळ नफा मिळणार आहे.

 हा प्रकल्प गव्हाणे बायो फ्युल चे अध्यक्ष विनायक गव्हाणे यांनी आपल्या तालुक्यात आणला असुन त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहत जे काही सहकार्य लागेल ते करण्याचे आश्वासन दिले. 

या प्रकल्पामुळे जवळपास दीड हजार तरूणांच्या हाताला काम मिळणार आहे.  

तालुका प्रदूषण मुक्त होईल. सेंद्रिय शेतीला चालना मिळेल. 

शेतकऱ्यांसाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध होईल. एकंदरीतच हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन प्रकल्पाच्या उभारणीस हातभार लावावा 

असे मत किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपचे नेते प्रफुल राठोड यांनी व्यक्त केले. या ठिकाणी गव्हाणे बायो फुल्यचे अध्यक्ष विनायक गव्हाणे  

कंपनी विषयी माहिती सांगताना सदरील प्रकल्प हा 50 कोटी रूपयांचा असुन जैविक इंधन व सेंद्रिय खत निर्मिती होणार आहे.

रोज 100 टन कच्चा माल लागणार असुन ते शेतकऱ्यांन कडुन प्रती टन एक हजार रुपयांनी  विकत घेतला जाणार आहे.

या मध्ये पलाट्या तुराट्या, नेपियर गवत तसेच शेतातील कोणताही कचरा विकत घेतल्या जाईल असे सांगितले 

जयआनंद शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक चंपतराव जाधव , वसंतराव नायक 

बायो फ्युलचे अध्यक्ष रामराव राठोड ,प्रा. डॉ. श्रीनीवास रेड्डी , दीपक पाटील. विशाल दासरवार. 

प्रविण सिरमनवार गजानन बंडेवार व संदीप गोजकुलवार आदि उपस्थीत होते .