Ticker

6/recent/ticker-posts

(प्रतिनिधी )माहूर तालुक्यातील मछिंद्र पार्डी शिवारातमादीजातीच्या बिबट्याचा मृत्यु झाल्याची घटना गुरुवार दि.22 एप्रिल रोजी उघडकीस आली. त्याच घटनेतील दूसरा नर जातीचा बिबट्या दि. 23 एप्रिल रोजी अंदाजे 15ते20मिटर अंतरावर म्रूतावस्थेत आढळून


(प्रतिनिधी )माहूर तालुक्यातील मछिंद्र पार्डी शिवारातमादीजातीच्या बिबट्याचा मृत्यु झाल्याची घटना गुरुवार दि.22 एप्रिल रोजी उघडकीस आली. त्याच घटनेतील दूसरा नर जातीचा बिबट्या दि. 23 एप्रिल रोजी अंदाजे 15ते20मिटर अंतरावर म्रूतावस्थेत आढळून आला हे

 दोनही बिबटे एकाच घटनेतील असून वनविभागाच्या कर्मच्यार्यांन दिसला नसल्याने त्यांचा कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले 

असून जनतेत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सदरचा प्रकार विष प्रयोगाने घडल्याची जोरदार चर्चा आहे.


मछिंद्र पार्डी शिवारातील मोतीराम जोधा राठोड यांच्या शेतात दि. २२ एप्रिल रोजी पहाटे एक मादी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला.

 ही बातमी परिसरात वा-यासारखी पसरल्यानंतर घटनास्थळावर बघ्यांची एकच झुंबड उडाली. दरम्यान बिबट्याच्या मृत्यूची होती. 

बातमी वनविभागाला कळविल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी बी.पी. आडे, वनपाल मीर साजिद आली,एम बी. राठोड, वनरक्षक संतोष तीदेवाड,साहेबराव सोनकांबळे, 

कोटकर हे दुपारच्या सुमारास घटनास्थळावर पोहचून पुढील कार्यवाही केली. परंतू याच घटनेतील दुसर्‍या नर जातीचा बिबट्या काही पावलाच्या अंतरावर सोनू चव्हाण यांच्या 

शेतात दि. 23एप्रील रोजी आढळून आला असल्याने वन्यजीव प्रेमीं नागरीकांमधून संताप व्यक्त केला जात असून मधमछिंद्र पार्डी येथे दि. 21एप्रील। मंगलवारी रात्री एका शेतात अज्ञात हिंसक वन्यप्राण्याने 

एका गोर्ह्यावर हल्ला करून ठार मारल्याची घटना घडली होती. मृत अर्धवट शरीरावर विष प्रयोग केल्याने सदरची घटना घडल्याची
विश्वसनीय माहिती उपलब्ध झाली आहे. 

याबाबत वनपरीक्षेत्र अधिकारी भगवान आडे यांना विचारणा केली असता हे दोनही बिबटे अल्पवयीन असून त्यांची आई देखील त्यांचेसोबत असल्याची शक्यता वर्तवली 
असून त्याचाही शोध घेणार आहोत सदर म्रुत बिबट्याचे दि. 24रोजी शवविच्छेदन केल्यानंतर पूढील कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोपीला अटक

दोनही बिबट्याच्या मृत्यूप्रकरणी वनविभागाने चौकशीची चक्रे गतिमान फिरविल्याने विषप्रयोग करण्यात आल्याची कबुली आरोपी शेतकरी प्रकाश जगनलाल जैस्वाल (वय 54 रा )
मच्छिंद्र पार्टी याने दिली आहे. 

शेतात गोठ्यात दोन बैल,एक गाई,व एक गोऱ्हा रात्री बांधले होते.त्या वर कुत्र्यांनी हल्ला केला असावा असे समजून मी मृत गोरह्यावर मोनोसिल नावाचे कीटकनाशक टाकून त्याला जुन्या बूजलेल्या अवस्थेतील विहिरीच्या खड्ड्यात टाकले होते.

असे अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी कबुली जबाब दिल्याचे वन परीक्षेत्र अधिकारी भगवान आड़े यांनी सांगितले असून सदर शेतकर्‍याविरोधात .

वन्यजीव संरक्षण कायद्यानूसार कार्यवाही करुन न्यालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 26एप्रिल पर्यंत वन कोठडी सुनावली आहे. गेल्या पंधरा दिवसापासून जंगलाला वनव्यामूळे लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले व त्या गंभीर बाबीकडे वनविभागाच्या अधिकारी व 

कर्मचाऱ्यांनी अक्षय्य दिरंगाई केल्याने वन्यप्राणी सैरभैर होउन शेतशिवारात धाव घेत असल्यानेच। या नर मादी बिबट्याला आपला जिव गमवाला। 

या गंभीर प्रकरणी र। वरिष्ठांनी जातीने लक्ष घालून चौकशीअंती संबधीतावर कठोर कारवाई करावी अशी मागणी वन्यजीव प्रेमी नागरिकांकडून केली जात आहे