Ticker

6/recent/ticker-posts

बाधितांचे प्राण वाचविणाऱ्या प्राणवायू निर्मिती प्रकल्पास खा. हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून 24 तास वीजपुरवठा सुरु



बाधितांचे प्राण वाचविणाऱ्या प्राणवायू निर्मिती प्रकल्पास खा. हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून 24 तास वीजपुरवठा सुरु 

किनवट : उप जिल्हा रुग्णालय गोकुंदा येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरच्या बाधितांचे प्राण वाचविणाऱ्या प्राणवायू निर्मिती प्रकल्पास (ऑक्सिजन जनरेशन प्लँट करिता ) 

खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून 24 तास विद्युत पुरवठा सुरु झाला आहे. 
   

    कोरोना प्रादुर्भावाने बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी उप जिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे डेडीकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर (डीसीएचसी) स्थापित केले आहे. येथील रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागते. 

याकरिता जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना 2020 -21 अंतर्गत येथे " ऑक्सिजन जनरेशन प्लँट " उभारण्यात आले.
जनरेटरवर हा प्लँट कार्य करत नाही. 

हे कार्यान्वित राहण्यासाठी 24 तास विद्युत पुरवठा असणे आवश्यक आहे.

 उपजिल्हा रुग्णालयास ग्रामीण फिडरच्याच वाहिणीचा विद्युत पुरवठा दिला आहे. 

ग्रामीण भागातील वीज खंडीत करावयाची झाल्यास येथील विद्युत पुरवठा सुद्धा खंडीत होतो. 
त्यामुळे गरजू रुग्णास ऑक्सिजन पुरवठाही खंडीत होतो. 

इतरत्र ऑक्सिजनचा तुटवडा आहे.

 येथे मात्र ऑक्सिजन जनरेशन प्लँट असून सुद्धा केवळ विद्युत पुरवठ्याच्या अभावी ऑक्सिजन मिळणे दुरापास्त  झाले आहे. 
   

  खतंत्र एक्सप्रेस फीडरद्वारे विद्युत व्यवस्था करण्यासाठी वैघकीय अधिक्षकांनी सार्वजनिक 

बांधकाम परिमंडळ नांदेडचे विद्युत निरीक्षक व येथील महावितरणचे उप अभियंता यांना वारंवार पत्रव्यवहार केला. 

परंतु त्याची दखल संबंधितांनी घेतली नाही.
 ही बाब दिशा समितीचे सदस्य तथा शिवसैनिक मारोती सुंकलवाड यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. 

तेव्हा खासदार पाटील यांनी विद्युत निरीक्षक यांना संपर्क साधून आवश्यक आरमोड केबल मुंबईवरून आणण्यास भाग पाडले. 

सागर टेक्नोचे कर्मचारी रहेमत उल्लाखान, शेख मोहम्मद बस्सी, रामकिशन बोगाडे, शेख शादुल्ला शेख बशीर यांनी दिवस रात्र काम करून केबल जोडणी केली आहे. 

तसेच महावितरण भोकरचे कार्यकारी अभियंता एम. एम. गोपुलवाड यांचेशी संपर्क साधून कोविड संसर्गाची स्थिती पाहता स्वतंत्र एक्सप्रेस फीडर सुरु करण्यास भाग पाडले. 

रुग्णांचे प्राणवाचविण्यासाठी अविरत प्राणवायू पोहचविण्यासाठी " प्राणवायू निर्मिती प्रकल्पास "  

अखंडित विद्युत पुरवठा सुरु करण्यासाठी सतत पाठपुरावा केल्याबद्दल जनतेनी खासदार हेमंत पाटील यांचे आभार मानले आहेत.