Ticker

6/recent/ticker-posts

किनवटमध्ये 4 एप्रिल 2021 रोजी 30 बाधितांची भर


किनवटमध्ये 4 एप्रिल 2021 रोजी 30 बाधितांची भर

किनवट : रविवार (दि. 4 एप्रिल 2021) रोजी दुपारी 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार एँटिजेन टेस्ट द्वारे 30   बाधित आढळले आहेत. 
       

   बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे  व होम क्वारंटाईन  एकूण 487 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

 सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार, भाप्रसे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांचे घर कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याचे आदेश इन्सिडंट कमांडर तथा तहसिलदार उत्तम कागणे यांनी काढले आहेत. 

उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांनी चोख पोलिस बंदोबस्त लावला आहे. 

जनजागृती कक्षाचे प्रमुख गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांच्या नेतृत्वात बाधित रुग्णांच्या समुपदेशनासाठी शिक्षकांचे पथक नियुक्त करण्यात आले आहेत. 

तेव्हा जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, 

असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे  व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.

किनवट तालुका कोरोना संक्षिप्त अहवाल

आरटीपीसीआर टेस्ट,
आज घेतलेले स्वॅब - 41,
आज आरटीपीसीआर पॉझिटिव्ह संख्या-0,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 95,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 0,

ऍन्टिजेन टेस्ट
ऍन्टिजन टेस्ट-220,
आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या- 30,
निगेटिव्ह अहवाल-190,

आज रोजी एकुण पॉझिटीव्ह (आरटीपीसीआर + एँटिजेन) रुग्ण- 30,

आज मृत्यू - 0,

होम क्वारंटाईन व रुग्णालयात उपचार घेत असलेले एकूण बाधित व्यक्ती- 487