नौखंडा कॉलेज परिसर मध्ये राहणाऱ्या फॅमिली वर 40 ते 50 गुंड लोकांनी केला हल्ला अनेक जण जखमी
औरंगाबाद प्रतिनिधी : आज दिनांक २ एप्रिल रोजी रात्री ९:०० ते ९:३० वाजेच्या सुमारास नौखंडा कॉलेज परिसरात राहणाऱ्या फॅमिली वर चाळीस ते पन्नास गुंड लोकांनी हल्ला केल्याने अनेक जण जखमी झाले
व काही लोकांना मुका मार लागला असुन सदर अर्जदार हे गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून नौखंडा काॅलेज परिसरात राहत आहे.
हा हल्ला जमीर पटेल व त्यांच्या दोन मुलांसोबत आलेल्या अनेक लोकांना हल्ला केल्याचे आरोप नौखंडा काॅलेज येथील रहिवासी यांनी केला असे सांगितले आहे.
सदर रहिवासी यांच्या म्हणण्याप्रमाणे हे लोक सदरील जागेवर कब्जा मिळवण्या करीता हा कट रचला होता.
सदर ठिकाणी हल्ला करणारे परिवारातील सदस्यांना व महिलांना तसेच छोट्या-मोठ्या बालकांना त्याच बरोबर घरा जवळ उभे
असलेल्या वाहनं व तीन आॅटो रिक्षांचा नुकसान केला तसेच बेदम मारहाण करून पोलीस येण्याची भितीने नंतर पडून गेले.
बेगमपूरा पोलीस यांना माहिती मिळाली असता सदर ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून पोलीस कर्मचारी यांना पाठवण्यात आले.
हल्यात जख्मी झालेल्या व्यक्तीनां घाटी रुग्णालयात उपचार साठी पाठवण्यात आले.