Ticker

6/recent/ticker-posts

कोरोनाची लस ही शरीरातील सैनिक ; 45 वर्षावरील सर्वांनी लाभ घ्यावा -सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार


कोरोनाची लस ही शरीरातील सैनिक ; 45 वर्षावरील सर्वांनी  लाभ घ्यावा 

-सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार 

किनवट  : कोरोनाची लस ही शरीरातील सैनिक आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती स्ट्राँग होणार आहे, तेव्हा 45 वर्षे वयोगटाच्या पुढील सर्वांनी याचा लाभ घ्यावा. 

असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी केले.
     

   कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या जिल्ह्यात हॉटस्पॉटमध्ये किनवट तालुका तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

यापासून बचावासाठी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय मांडवी, तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे लसीकरण केंद्र उघडले आहे. 

लसीविषयी कोणताही गैरसमज न करता सर्व जनतेंनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा लाभ घ्यावा,

 अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नेहमी मास्कचा वापर करावा, साबणाने स्वच्छ हात धुवावे, शारीरिक अंतर ठेवावे,

 या त्रिसूत्रीचा वापर करावा, माझी जबाबदारी म्हणून आपण व  आपले कुटूंब सुरक्षित ठेवावे, असेही श्री पुजार म्हणाले.

किनवटमध्ये 2 एप्रिल 2021 रोजी 62 बाधितांची भर

शुक्रवार (दि. 2 एप्रिल 2021) रोजी दुपारी 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार एँटिजेन टेस्ट द्वारे 44 व आरटीपीसीआर टेस्ट द्वारे 18 असे एकूण 62 जण  बाधित आढळले आहेत. 
     

     बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 137  व होम क्वारंटाईन 85 अशा एकूण 228 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

रुग्णांचे घर कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याचे आदेश इन्सिडंट कमांडर तथा तहसिलदार उत्तम कागणे यांनी दिले आहेत. 

जनजागृती कक्षाचे प्रमुख गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांच्या नेतृत्वात बाधित रुग्णांच्या समुपदेशनासाठी शिक्षकांचे पथक नियुक्त करण्यात आले आहेत. 

तेव्हा जनतेनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या,

 असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे  व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.

किनवटतालुका कोरोना संक्षिप्त अहवाल

आरटीपीसीआर टेस्ट,

आज घेतलेले स्वॅब - 71,

आज आरटीपीसीआर पॉझिटिव्ह संख्या-18,

स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या -195,

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 0,

ऍन्टिजेन टेस्ट

ऍन्टिजन टेस्ट- 187,

आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या- 44,

निगेटिव्ह अहवाल-143,

आज रोजी एकुण पॉझिटीव्ह (आरटीपीसी आर + एँटिजेन) रुग्ण- 62,

आज मृत्यू - 0,

होम क्वारंटाईन व रुग्णालयात उपचार घेत असलेले एकूण बाधित व्यक्ती- 228