किनवट , दि.१ : एका पत्रकारा विरुद्ध सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली नोटीस त्या पत्रकारांपर्यंत पोहोचण्याआधीच समाज माध्यमावर वायरल करण्यात आली आहे.
अशा प्रकारची नोटीस काढणे म्हणजे
वृत्तपत्राची,संपादक व पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार आहे. हा प्रकार म्हणजे पत्रकारांच्याअभिव्यक्ती स्वातंत्र्याची आणि वृत्तपत्राची गरिमा ढासाळाण्याचा प्रकार आहे.
वृत्तपत्र संपादक आणि पत्रकार या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला त्यांचे खच्चीकरण न करता त्यांना नि:पक्ष, निर्भीड वृत्तसंकलन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे,
अशा आशयाचे निवेदन पत्रकाराच्या एका शिष्टमंडळाने आज (दि.१) सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सादर केले.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी निप:क्षपातीपणे चौकशी करूनच पुढील कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीनिशी एक पत्र सध्या सोशल मीडियावर वायरल झाले आहे.
त्यात साप्ताहिक "किनवट शक्ती",चे संपादक प्रशांत वाठोरे यांच्याविरोधात साप्ताहिका मध्ये डॉक्टरविरुद्ध मजकूर छापल्यामुळे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये? तसेच
"किनवट शक्ती", साप्ताहिक बंद करण्याची पुढील कार्यवाही का करण्यात येऊ नये?,
अशा आशयाची नोटीस सध्या समाज माध्यमावर सर्वत्र फिरत आहे.
या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांच्या शिष्टमंडळाने सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या संबंधाने निवेदन सादर केले.
पत्रकारांच्या शिष्टमंडळात ज्येष्ठ पत्रकार प्रदीप वाकोडीकर, गोकुळ भवरे, प्रा. जयवंत चव्हाण, ॲड. मिलिंद सरपे, प्रमोद पोहरकर यांच्यासह अनेकांचा समावेश होता.