मळणी यंत्राद्वारे गहू काढत असताना नागोजी माधव कदम या तरुणाचा हात मळणीयत्राने आतमध्ये ओढल्याने तो मळणी यंत्रामध्ये अडकून त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जलधरा येथे आज
दिनांक 31 मार्च 2021 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
जलधरा येथील बाबुराव गोविंदराव पाचपुते यांच्या शेतातील ट्रॅक्टर वरील मळणी यंत्र द्वारे गहू
काढत असताना नागोजी महादेव कदम राहणार सावरगाव वय 32 वर्षे याचा मळणी यंत्र मध्ये हात गेल्याने मळणी यंत्राने आत मधे घेतल्याने नागोजी महादेव कदम यांचा जागीच मृत्यू झाला
या घटनेची माहिती मयताच्या संबंधित नातेवाईकांनी इस्लामपूर पोलिसाला दिल्याने इस्लापूर पोलीस ठाण्याचे एस आय शेख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी हा मृतदेह शिवनी येथील प्राथमिक