Ticker

6/recent/ticker-posts

*दिव्यांग व वयोश्री साहित्य मोजमाफ शिबिरात करोडो रुपये खर्च करून शासन प्रशासन यांच्या हलगर्जीपणा मुळे गेला व्यर्थ? शासन प्रशासन यांना कधी येईल जाग? दिव्यांग सं. अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर


दिव्यांग व वयोश्री साहित्य मोजमाफ शिबिरात करोडो रुपये खर्च करून शासन प्रशासन यांच्या हलगर्जीपणा मुळे गेला व्यर्थ? शासन प्रशासन यांना कधी येईल जाग?  दिव्यांग सं. अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर

    

 केंद्र शासनाच्या वयोश्री व एडिआयपि योजनेअंतर्गत भारतिय कृतिम अंग निर्माण निगम,जिल्हा प्रशासन दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि 10 डिसे 2019ते 26 

डिसे 1 9 पर्यंत नांदेड जिल्ह्यातील सोळा हि तालुक्यात मोठ्या जाहिराती करून लाखो रूपये खर्च करून राजकीय नेते यांच्या उपस्थितीत दिव्यांग वयोश्री मोजमाप शिबिर घेण्यात आले होते .
     
या शिबिरात ज्या दिव्यांग व वयोवृद्ध हात, पाय नसेल,दात,डोळे यांची तज्ञ डाँक्टरकडुन तपासणी करून त्यांचे मोजमाप घेण्यात आले होते. 

ते आज दोन वर्षांपूर्वी घेतलेले मोजमाप आज उपयोगात येईल काय? 

आज जगात कोनाच्या संकटकाळी हे साहित्य ग्रामपंचायत मार्फत वाटप केले गेले असता लाखो रूपये  पाण्यात गेले असते काय?  

ज्या आशेने पडत झडत दिनदुबळे दिव्यांग वयोवृध्दाना आधार मिळाला नसता काय? 

हि बाब शासन प्रशासन यांच्या का? लक्षात आली नाही? असो अनेक अडचणी मुळे लक्षात आली नसेल?

  तेव्हा दिव्यांग संघटनेने निवेदन मोर्चा,शोशल मिडिया आपले लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला असता शासन प्रशासन यांना  का जाग आली  नाही? 

 नांदेड जिल्ह्यात शासन प्रशासन जागे व्हावे दिन
दुबळ्याना न्याय मिळावा म्हणून 
ज्यांना चालता येत नाही, 

जगात काय चालले दिसत नाही ऐकू येत नाही, अशाने केलेले आंदोलन लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना का दिसत नाही? 
 
     सनदशीर मार्गाने केलेल्या आंदोलनात या लोकशाहीत न्याय का मिळत नाही? 
   

  दिनदुबळ्याना दोन वर्षांपूर्वी घेतलेले मोजमाप शिबिरातील साहित्य आता तरी मिळेल काय शासन प्रशासन जागे होईल काय असा सवाल दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल 
कुंचेलीकर जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले,राजु शेरकुरवार गजानन हंबर्डे, राहुल सोनुले, विठ्ठल बेलकर, ईत्यादी कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध पाक दिले