✍️✍️ *माझे बाबासाहेब* ✍️✍️
जय भीम बोल,
लाजतो तरी कशाला,
नसेल म्हणायचे तर,
जगतो तरी कशाला...
*एकच साहेब,माझे बाबासाहेब...!*
जातीभेद करु नका,
असे बाबासाहेब सांगती,
तेच आपल्या देशासाठी,
तन,मन,धन अर्पण करती...
*एकच साहेब,माझे बाबासाहेब...!*
अरे माणसांना माणसांत,
बाबासाहेबांनीच आणिले,
तेंव्हा गुणगान सर्वांनी,
भीमांचेच गायिले...
*एकच साहेब,माझे बाबासाहेब...!*
असा हा कोहिनूर हिरा,
पुन्हा ना होणे,
उगीचच एकमेकांचे,
कशाला काढता उणेधुणे...
*एकच साहेब,माझे बाबासाहेब...!*
आले किती,गेले किती,
नाही झाले त्या समान,
बाबासाहेबांच्याच घटनेवरी,
आहे देशाची कमान...
*एकच साहेब,माझे बाबासाहेब...!*
सिंहाचे छावे आम्ही,
नाही कुणा भिणार,
भीमांचे विचार अन् आचार,
सदैव आचरणात आणणार...
*एकच साहेब,माझे बाबासाहेब...!*
असा हा घटनेचा शिल्पकार,
आहे विश्वरत्न,
म्हणूनच त्यांच्या पाठीशी,
सदैव भारतरत्न...
*एकच साहेब,माझे बाबासाहेब...!*
असे माझे बाबासाहेब,
आहेत खुपच महान,
म्हणूनच मी अर्पण करतो,
चरणी त्यांच्या प्रणाम...
*एकच साहेब,माझे बाबासाहेब...!*
*- राजेंद्र लाड (शिक्षक)*
*आष्टी,ता.आष्टी,जि.बीड*
*मो.९४२३१७०८८५