Ticker

6/recent/ticker-posts

जेष्ठ नागरिक श्री विठ्ठलराव सिलमवार यांचे अंबाडीत अंत्यविधी संपन्न.



जेष्ठ नागरिक श्री विठ्ठलराव सिलमवार यांचे अंबाडीत अंत्यविधी संपन्न.

प्रतिनिधी- मौजे अंबाडी येथील मन्नेरवारलू समाजातील जेष्ठ नागरिक तथा भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते व आमदार भीमराव केराम यांचे 

समर्थक श्री विठ्ठलराव सिलमवार वय ७५ वर्ष यांचे आज पहाटे चार वाजता त्यांच्या मूळ गावी अंबाडी येथे अल्पशा आजाराने निधन झाले 

असून त्यांची अंत्यविधी अंबाडी ता. किनवट येथे आज रविवार दिनांक २५ एप्रिल 2021 रोजी दुपारी तीन वाजता कोव्हीड-१९ च्या सर्व नियमाचे पालन करून अंत्यविधी संपन्न झाले. 

श्री विठ्ठलराव सिलमवार यांना अस्थमाचा जुनाट त्रास होता ते काही दिवसापासून अन्न बंद केले होते.मृत्युसमयी ते ७५ वर्षाचे होते.

श्री विठ्ठलराव सिलमवार हे भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते होते त्यांनी भाजपच्या तालुका किसान  आघाडीचे तालुका संघटक सोबतच सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय सहभाग राहत होता.


त्यांना   किनवट चे आमदार भिमराव केराम, नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर, भाजपा नेते अशोक पाटील सूर्यवंशी,सुरेश रंगेनवार,बाबुराव पुजरवाड आदींनी शोक संदेश व्यक्त केले,यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव,

जिल्हा परिषद सदस्य मधुकर राठोड, जिल्हा परिषद सदस्य संजय राठोड,खासदार हेमंत पाटील यांचे यांचे जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड,संजू रेड्डी पळशीकर,पत्रकार गोकुळ भवरे,शशिकांत लढे यांच्यासह 

ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष बालाजी पोगुलवार,ग्रामविकास अधिकारी सिरसेवाड,ग्रामसेवक सटलावार,कृषि पर्यवेक्षक भालेवाड, कोटुलवार,पोलीस जमादार 

बोंडलेवाड,पोलीस नाईक संदूपटलेवार,वैद्किय अधिकारी डॉ.व्यंकट आईटवार, डॉ.जाधव, डॉ सल्लावार,शुभम माडे,सुनिल बोलेंनवार, 

किसन यासमवार, प्रा.नरेंद्र कोगुरवार,गुणाजी पडलवार आदींनी सिलमवार परिवाराच्या दुःखात सहभागी होऊन श्री विठ्ठलराव सिलमवार यांना श्रद्धांजली वाहिली .