Ticker

6/recent/ticker-posts

गंभीर आणि गमतीदारबहुतेक सगळं बंद आहे , पण काही चालू आहे , तसा कडक लॉक डाऊन आहे


गंभीर आणि गमतीदार

बहुतेक सगळं बंद आहे , पण काही चालू आहे , तसा कडक लॉक डाऊन आहे ,

पण रस्त्यावर रहदारी चालू आहे ! 

दुकाने बंद आहेत ,पण गरजेनुसार उघडतात , मेडिकल दुकाने उघडी आहेत 

पण लोकांना पाहीजे ती औषधे मिळणे दुरापास्त आहे ! 

तशी सर्वत्र बंदी आहे , पण व्यवहार चालू आहेत ! 
संचारबंदी चालूच आहे ,

 पण भाजीवाले सर्व कॉलनीत फिरतात  ! 
नियम कडक आहेत ,
 पण किराणा दुकानावर गर्दी आहे ! 


घरात बसणाऱ्यांना कोरोनाची भीती आहे , 
पण मास्क ना घालता उगाच बाहेर पडणाऱ्याना कोरोनाच्या भय नाही !

कायदा व सुव्यवस्था चोख आहे , 
फक्त असायला पाहिजे ,तिथे नाही !

.. वरील मजकुरावरून काही कळलं असल्यास , आम्हास पण समजावून सांगणे !