Ticker

6/recent/ticker-posts

दादा तुमच्या बद्दल लिहावं तेवढं कमीच, कुठून सुरुवात करायची हेच कळेणा अरुण दादा आळणे यांनी आदिवासी तालुका मानला जाणाऱ्या किनवट तालुक्या सारख्या ठिकाणी ''संथागार'' वृध्दालयाची स्थापना


दादा तुमच्या बद्दल लिहावं तेवढं कमीच, कुठून सुरुवात करायची हेच कळेणा
 अरुण दादा आळणे यांनी आदिवासी तालुका मानला जाणाऱ्या किनवट तालुक्या सारख्या ठिकाणी ''संथागार''  वृध्दालयाची स्थापना करून तालुक्याच्या निराधार वृध्दांना अन्न, वस्त्र, निवारा व यांसारखे सोई सुविधा देतात.

यात त्यांची पत्नी, मुलगी आणि मुलगा याचीदेखील सोबत असल्याचे अतुलनीय वाटते. 

त्याबरोबरच माझ्या माहिती नुसार सन 2010 पासून ''अरुण दादा'' दर वर्षी जागतिक बौद्ध धम्म परिषदचे आयोजन करत आहेत.

शिवाय ते तालुक्यातील अनेक युवक वा व्यक्तीचे किनवट शहरातील लहान सहान समास्या मार्गी लावतात. 
या सर्व करत असलेल्या कामा वरून  निस्वार्थ समाजसेवा करणारा दुसऱ्या तालुक्याच्या तुलनेत किनवट तालुक्यामध्ये अरुण दादा सारखे नेता असल्याचा मला अनेकदा गौरवान्वित झालं. 

याशिवाय आदिवासी तालुका म्हणून प्रसिध्द असलेला किनवट तालुक्यासारख्या ठिकाणीही वृध्दालय भरून जातात, शहरी भागासारख आई- वडिलांचा त्रास सर्वत्र असल्याचंही खंत वाटते.


माझा भाऊ स्व. सुनिल ईरावार हा मला अनेकदा तुम्ही केलेल्या समाज सेवाच कौतुक सागयचा... दादा अनेक जनाचे प्रेरणास्थान असावेत त्यापैकीच मीही एक, 

आपल्या सारखे समाजसेवा करायचे, परंतु आयुष्यातील आर्थीक परीस्थिती मूळे मजुरी केल्या शिवाय संसाराचा गाडा चालत नाही. 

पण माझ्याकडे या जगातलं  सर्वात मोठ सुख म्हणजेच माझे ''आई-वडिला'', व सर्व कुटंबियां सोबत समाधानी राहत असल्याचे सुख, यांच्या शिवाय जगण्याचा विचार करू शकत नाही. 

आई-वडिल यांनी आम्हा 4 भावां जन्माला घातलेच, 

जेमतेम आर्थीक परिस्थीतमध्ये स्वताच्या पोटाचा चिमटा काढून,  आमच्या गरजा पूर्ण केल्या.

 आई-वडिलाचे योगदानाबद्दल मि त्यांना याजन्मात तर काय असे कितीही जन्म घेतलं तरीही परत फेड करू शकत नाही. 

त्यामुळे याजन्माचे एकही दिवस मला आई-वडिलां शिवाय रहण्याचा प्रश्नच नाही.
अरुण दादानां जन्मदिवसाच्या मंगल कमना ...