प्रा.डॉ. अंबादास कांबळे ह्या दैदिप्यमान कार्यकर्त्यांच्या जाण्याने पुढच्या पिढीचं मोठं नुकसान झालं
-समाजसेवक डॉ. अशोक बेलखोडे
किनवट : प्रा.डॉ. अंबादास कांबळे ह्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात दैदिप्यमान कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचं जाण हे जिव्हारी लागणारं आहे,
पुढच्या पिढीचं मोठं नुकसान करणारं आहे. सर्व बाबतीत संवेदनशील असलेला हा माणूस होता. असे प्रतिपादन समाजसेवक डॉ. अशोक बेलखोडे यांनी केले.
येथील नाटककार तथा बळीराम पाटील महाविद्यालयाचे जीवशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. अंबादास कांबळे यांचं शुक्रवार (दि.23) रोजी निधन झालं. त्यांच्या पावन स्मृतिंना अभिवादन करण्यासाठी
शनिवार (दि.24) रोजी सायंकाळी 6 वाजता साने गुरुजी रुग्णालयात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते.
मंचावर ऍड. मिलिंद सर्पे, प्राचार्य डॉ. आनंद भंडारे हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.
उत्तम कानिंदे यांनी बुद्धवंदना घेतली व सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ मार्तंड कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी प्रा. चंदेले, प्रा.डॉ. सुरेंद्र शिंदे, प्रा.डॉ.पंजाब शेरे, प्रा.डॉ.सुनिल व्यवहारे,