मुस्लिम तरुण मुले भारतातील अनेक शहरांमध्ये रुग्ण सेवा, रुग्ण सहाय्य, रुग्ण बाधित कुटुंब मदत ह्या सर्व क्षेत्रात विलक्षण काम करीत आहेत...
मागच्या वेळेस हीच कामगिरी त्यांनी स्थलांतरित मजुरांसाठी केली होती...
त्यांनी नबींचा आदर्श प्रत्यक्ष जीवनात प्राणाची बाजी लावून उतरविण्याचा घनघोर प्रयत्न सुरू केला आहे...
ही मुले सांपत्तिक दृष्ट्या सधन नाहीत; ह्या देशात ती संधी त्यांना नसतेच बहुदा...
त्यांनी सामाजिक भांडवलाची जोड सद्भावाला देऊन तप मांडले आहे...
छोटी, छोटी मुले साने गुरुजींची धडपडणारी मुले झाली आहेत...
हा माझा, मी क्वचित आणि विरळ्या संदर्भात मानीत असणारा, भारत देश आहे.
माझ्या
मुस्लिम समाजाची मुले माझे मानबिंदू आहेत...