Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांचा आदेशाचा फज्जा उडवत किनवट मध्ये अवैध धंदे सुरू

मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांचा आदेशाचा फज्जा उडवत किनवट मध्ये अवैध धंदे सुरू.!

किनवट : कोरोना या महामारीचा काळात लॉकडाऊन मुळे आधीच गोरगरिबांचा हाताला काम नसल्यामुळे गोरगरिबांना उपासमारीची वेळ आली आहे, त्यात किनवट तालुक्यात अवैध धंदे वाल्यांनी किनवट तालुक्याला विळखा घातला आहे.

 मटका आणि गुटखा वाल्यांना किनवट पोलिसांचे खुले पाठबळ असल्याने या महामारीचा बंद काळात खुलेआम काळे धंदे चालू आहेत. ज्यामुळे गोरगरिबांचे संसार धुळीस मिळाले आहेत.

मुख्यमंत्री,जिल्हाधिकारी यांचा कोरोना बाबत जमावबंदी आदेशाचा फज्जा उडवत किनवट मधे अवैध धंदे जोमात चालु आहेत.


किनवट शहरात  रेल्वे स्टेशन परिसरात खुलेआम गुटखा विक्रीचा होलसेल व्यापार चालु आहे आणि शहर बिट जमादार त्यांचा गुठ्ख्याचा 

गाड्यांना संरक्षण देत माहूर, सारखणी आणि हिमायतनगर येथून बिनदिक्कत किनवट मधे घरपोच संरक्षण देत आहेत. 

तर साई नावाच्या मटका बुकीचा मटका आणि जुगार खुलेआम माहूर रोड वरती रेल्वे ब्रीजचा पलिकडे, शिवाजीनगर, नालागड्डा परिसर, बस स्टँड परिसर आणि जुनी जिनिग परिसरात खुलेआम चालू आहे, 

तर मोठ्यप्रमाणावर फोन वरती मटका घेतला जात आहे. नुकत्याच सूरू झालेल्या आयपीएल मधे किनवट शहरात सट्टा बुकी सट्टा घेतांना सगळीकडे दिसत आहेत.
 
मटका आणि गुटखा यांचा आहारी गेल्याने शेकडो लोकांचे संसार धुळीस मिळाले आहेत. रक्षकच भक्षक बनले असतील तर गोरगरिबांनी दाद कोणाला मागावी.


गोकुंदा,इस्लामपुरा, एस.व्ही. एम कॉलोनी येथे राहणारे बुकी आयपीएल वर लाखोंचा सट्टा चालवत आहे.हे सट्टा,मटका चालवणारे कोण? हे पूर्ण शहराला माहीत असताना आज पर्यंत यांचा वरती कोणतीच कार्यवाही आजपर्यंत का झाली नाही?


लॉकडाऊन चे नियम फक्त वैध धंदे वाल्यांनाच का? जर अवैध धंद्याला लॉकडाऊन चे नियम लागू होत नसेल तर नागरिकांना अवैध धंदे सुरू करावे लागतील.


जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी या कडे लक्ष देऊन त्वरित अवैध धंदे बंद करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.


हे प्रकार असेच चालू राहिले तर या अवैध धंद्यांना बंद करण्यासाठी नागरिकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल.

आत्ता जिहाधिकारी आणि पोलीस अधीक्षक किनवट मधे सर्जिकल स्ट्राईक करून अवैध धंदे कायम स्वरूपी बंद करतात की काय या कडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे.