Ticker

6/recent/ticker-posts

जंगलाला लागलेल्या आगीत वनसंपदेसह वन्यप्राणी जळून खाक? (वनविकास महामंडळ कुंभकर्णी झोपेत.



जंगलाला लागलेल्या आगीत वनसंपदेसह वन्यप्राणी जळून खाक? 
(वनविकास महामंडळ कुंभकर्णी झोपेत.!)

किनवट (लोकरत्न प्रतिनिधी) 
मराठवाड्यात एकमेव असणाऱ्या किनवट येथील
वनविकास महामंडळ अंतर्गत असलेल्या जलधरा वनपरिक्षेत्रा मधील जंगल गेल्या चार दिवसापासून आगीच्या झळानी

 झुरसत असून प्रचंड मोठ्यप्रमाणावर लागलेल्या या आगीमध्ये करोडो रुपयाची वनसंपदा जळून खाक झाली आहे,

 तसेच जंगलातील हरण, नीलगाय, रान डुक्कर, 

सरपटणारे प्राणी असे अनेक वन्यप्राणी देखील जळून खाक झाल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

 वन विकास महामंडळाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी मुख्यालयी न राहता जलधारा या वनपरिक्षेत्र पासुन ३५ किमी दूर 

किनवट येथे राहुन कारभार हाकत असल्यामुळे चार दिवसापासून आग लागलेली असतानाही त्यांना ती विझवण्याची तसदी घेता आली नाही. 


त्यामुळं जंगल मोठ्यप्रमाणावर नष्ट तर झाले 

आहेच पण किती वन्यप्राणी आगीत जळून मेले याची विभागीय चौकशी करून संबंधित अधिकारी वरती तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी वन्य प्रेमी जनतेने मांडली आहे.

 मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यामध्ये असलेले वनविकास महामंडळाचे कार्यालय हे एकमेव कार्यालय आहे. 

या कार्यालय अंतर्गत जलधारा येथे वनपरिक्षेत्र कार्यालय आहे.

येथील जंगल हे मौल्यवान टिकाऊ सागवान लाकडासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये देखील प्रसिद्ध आहे.

अशा या राखीव जंगलासाठी वन विकास महामंडळ आणि प्रादेशिक वन विभाग असे दोन विभाग नेमले असून या दोन्ही विभागाअंतर्गत जंगलाचे रक्षण केले जाते.

मात्र किनवट वनविकास महामंडळा अंतर्गत येणाऱ्या जलधरा वनपरिक्षेत्रातील २५६,२५७,२५८ आणि २५९ या क्रमांकाच्या बीट मध्ये गेल्या चार दिवसापासून जंगलाला आग लागलेली आहे.

आग गेल्या चार दिवसापासून सतत वाढतच आहे मात्र वन विकास महामंडळाकडून याची दखल घेतली जात नाही.

अशा या आगीमध्ये मौल्यवान वनसंपदा जळून खाक झाली आहे.

त्याचबरोबर या जंगलातील हरण, नीलगाय, रान डुक्कर 

आणि इतर सरपटणारे वन्य प्राणी तसेच लहान-मोठे वन्य प्राणी देखील जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे.

जलधरा गावातील माधव खंदारे यांनी आग विझवण्यासाठी तरुण मुलांना घेऊन आग विझवू या 

असे वनविकास महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना विचारले असता वन अधिकाऱ्याकडून व कर्मचाऱ्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे.

जंगलाला आग लागल्याने आग विझवण्यासाठी लाखो रुपयाच्या मशिनी दिले आहेत.

मात्र ही मशिन ऑफिसमध्येच पडून आहेत याचा कुठलाही उपयोग होत नाही असे देखील त्यांनी बोलून दाखवली आहे.

वरिष्ठांनी या कडे लक्ष देऊन उच्च स्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी वन्य प्रेमी नागरिकांकडून होत आहे.