Ticker

6/recent/ticker-posts

टिपू सुलतान ब्रिगेड, यवतमाळ तर्फे नरसिंहानंद सरस्वती विरुद्ध तक्रार दाखल


टिपू सुलतान ब्रिगेड, यवतमाळ तर्फे नरसिंहानंद सरस्वती विरुद्ध तक्रार दाखल         

दि. 2 एप्रिल, 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजता प्रेस क्लब द्वारे आयोजित केलेल्या 

एका पत्रकार परिषदेत दीपक त्यागी उर्फ नरसिंहानंद सरस्वती नावाच्या एका साधू वेषातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने जगाला प्रेम, 

मानवता आणि शांतीचा संदेश देणारे महामानव इस्लामचे शेवटचे प्रेषित मुहम्मद स. अ. स. 

यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांचा घोर अपमान केला आहे. 

त्याचा तो विडीओ सोशल मीडिया वर वायरल सुद्धा झालेला आहे. 

प्रेषित मुहम्मद स. अ. स. यांच्या प्रती जगातील सर्व जाती आणि धर्मातील लोकांमध्ये अत्यंत आदराचे स्थान आहे. 

त्यामुळे  नरसिंहानंद सरस्वती बद्दल लोकांमध्ये, विशेषतः मुस्लीम समुदायामध्ये प्रचंड रोष आहे. 

नरसिंहानंद सरस्वतीने जाणीवपूर्वक मुस्लीम धर्मीयांच्या भावना दुखविण्याचा आणि समाजात 

दुही व तेढ निर्माण करून देशातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. 
तरी नरसिंहानंद सरस्वतीवर संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल अटक करण्यात यावी 

अशी तक्रार टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ. जहीरुद्दिन पठान यांच्या मार्गदर्शनाखाली टिपू 

सुलतान ब्रिगेड, जिल्हा यवतमाळच्या वतीने उमरखेड पोलीस ठाण्यात देण्यात आली. 

यावेळी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मोहम्मद अवेस यांच्यासह साजिद भाई, असीम भाई, शेख 

आरीफ, जमीर रज़ा, रहेमत भाई, शाहरूख पठाण इ. कार्यकर्ते उपस्थित होते.