किनवट, दि.९ : एपी अँड जीपी असोसिएशसं(जेपी)कंत्राटदार अकोला
यांनी दि ९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता समता नगर किनवट येथील पाण्याच्या टाकी परिसरात आयोजित केलेल्या किनवट शहर वाढीव पाणी पुरवठा ( नळ)
योजनेच्या खासगी कार्यक्रमात अनेक जण उपस्थित राहून जमावबंदीच्या कायद्याचे उल्लंणघन करणाऱ्या लोकप्रतिनिधी
अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात यावे अशी मागणी शहरातील कांही कायदा प्रेमीं नागरिकांनी केल्याने
जमावबंदीचे उल्लंणघन करणाऱ्या लोकप्रतिनिधी अधिकारी व पदाधिकारी यांचे धाबे दणाणले आहे
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या दिवसा सात ते रात्री आठ या काळात जमावबंदी लागू आहे
तर रात्री आठ ते सकाळी सात या काळात संचारबंदी लागू आहे
असे असतानाही दि ९ एप्रिल रोजी एपी अँड जीपी असोसिएट ( जे वी) यांनी सकाळी ११ वाजता समता नगर पाण्याच्या टाकी परिसरात
किनवट शहर वाढीव पाणी पुरवठा ( नळ) योजनेच्या भूमिपूजनाचा खासगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
या कार्यक्रमास जमावबंदीचे आदेश धाब्यावर बसवत जवळपास १०० च्या आसपास लोक उपस्थित होते
विशेष म्हणजे जमावबंदी व संचारबंदी कायद्याचे
अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या तालुका प्रशासनावर असते त्यापैकीच कांही जण या कार्यक्रमास उपस्थित होते
यात सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार,आमदार भीमराव केराम,
तहसीलदार उत्तम कागणे,मुख्याधिकारी निलेश सुंकेवार,नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,
उपनगराध्यक्ष व्यंकट नेम्मानीवार,पाणीपुरवठा सभापती अजय चाडावार यांच्यासह नगरसेवक व नगरपरिषद कर्मचारी यांचा प्रमुख सहभाग होता
कालच दि ८ एप्रिल रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी
कार्यालयाच्या सभागृहात शांतता सनीतीची बैठक झाली होती या बैठकीचा समारोप करतांना किर्तीकिरण पुजार म्हणाले होते
की कोविड १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात जमावबंदी व संचारबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे
या कायद्याचा भंग करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज लोकप्रतिनिधी, अधिकारी व पदाधिकारी यांनीच
एका कंत्राटदाराच्या खासगी कार्यक्रमास उपस्थित राहून जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंणघन केले आहे
यांच्यावर जिल्हाधिकारी काय कार्यवाही करतील याकडे किनवटकर जनतेचे लक्ष लागले आहे दरम्यान जमावबंदीचे उल्लंणघन करणाऱ्या अधिकारी
पदाधिकारी व लोकप्रतिनिधीवर गुन्हा नोंदविण्यात यावा अशी फिर्याद
सामाजिक कार्यकर्ते अभय नगराळे यांनी पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे केली आहे
लोकप्रतिनिधी ,अधिकारी, पदाधिकारी यांनी जमावबंदी कायद्याचे उल्लंणघन केल्या
प्रकरणी गुन्हा नोंदविला नाही तर येत्या महात्मा जोतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या