Ticker

6/recent/ticker-posts

नाटककार प्रा.डॉ. अंबादास कांबळे यांचे निधनकिनवट : राजर्षी शाहूनगर, गोकुंदा येथील रहिवाशी प्रख्यात नाटककार तथा बळीराम पाटील महाविद्यालयातील जीवशास्त्र विभाग


नाटककार प्रा.डॉ. अंबादास कांबळे यांचे निधन

किनवट : राजर्षी शाहूनगर, गोकुंदा येथील रहिवाशी प्रख्यात नाटककार तथा बळीराम पाटील महाविद्यालयातील जीवशास्त्र विभाग 

प्रमुख प्रा. डॉ. अंबादास कांबळे ( वय 56 वर्षे ) यांचे शुक्रवार (दि. 23 एप्रिल 2021 ) राजी रात्री 10 वाजता नांदेड येथे  निधन झाले. त्यांचे पश्चात आई, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे.
      

  प्राणीशास्त्रात त्यांनी पी.एच.डी. घेतली होती परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून नाट्यशास्त्रात पदवी घेऊन रंगभूमीवरील आपली आवड सिद्ध केली होती. 

विविध विद्यापीठाच्या युवक महोत्सवात त्यांच्या एकांकिकांनी पारितोषीके पटकाविली आहेत.
    

   देशभरातील विविध विद्यापीठातून त्यांनी शोध निबंध वाचले होते. साहित्य अकादमी,

 नवी दिल्लीने प्रकाशित केलेल्या एकांकिका संग्रहात त्यांच्या "गाव हरवलेली माणसं" या एकांकिकेचा समावेश केला आहे. त्यांचा " 

श्वानपुराण आणि इतर एकांकिका " हा एकांकिका संग्रह प्रकाशित झाला आहे. हैद्राबाद मुक्ती संग्रामात आंबेडकरी स्वातंत्र्य सैनानींचे ( कार्यकर्त्यांचे ) योगदान हा नाट्यग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
     

  अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे राज्य सरचिटणीस, सेक्युलर मुव्हमेंटचे राज्य सह सचिव, महाबोधी सोसायटीचे आजीवन सदस्य, सप्तरंग संस्थेचे संस्थापक, 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष, प्राध्यापक संघटनेचे सक्रीय पदाधिकारी व किनवट तालुका पत्रकार 

संघाचे माजी अध्यक्ष अशा विविध संस्थाचे ते पदाधिकारी होते. स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे सिनेट सदस्य म्हणून त्यांनी काम केले. 

राज्यभरातील अनेक विद्यापीठांच्या युवक महोत्सवात परिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. कॉपीमुक्त परीक्षा घेणारे केंद्र संचालक म्हणून विद्यापीठ कार्यक्षेत्रात त्यांचा दरारा होता.
     

     प्राध्यापकांच्या समस्यांसाठी संघटनेच्या माध्यमातून  झटणारे  कार्यकर्ते, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील समर्पित व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. 
   

    शनिवार (दि. 24 ) रोजी पहाटे 4 वाजता गोकुंदा येथील पैनगंगातिरी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजसेवक डॉ. अशोक बेलखोडे, पीरिपचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे,

 उपसरपंच शेख सलीम, ग्राम पंचायत सदस्य ज्ञानेश्वर सिडाम, अॅड. जी.एस. रायबोळे, प्रा.डॉ.सुनिल व्यवहारे, प्रा.डॉ. सुरेंद्र शिंदे, प्रा.डॉ.पंजाब शेरे, प्रा. विजय खुपसे, प्रा. चंदेल, उत्तम कानिंदे आदिजन उपस्थित होते.