मुंबई- राज्यातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण दिले आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन आवश्यक असल्याचा पर्याय सरकारकडे आहे.
मात्र त्याबाबत विरोधी पक्षांची भूमिका काय हे जाणून मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीन आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळतो आहे.
राज्यातील प्रत्येक शहरात दररोज हजारांच्या घरात कोरोना रुग्ण दाखल होत आहेत
मृत्यूदरही वाढल्याने स्मशानभूमी फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे कधी एकाच सरणावर ८ मृतदेह तर कधी एकावेळी २२ मृतदेहांना अग्नी द्यावा लागतो.