पत्रकार भंडारे यांच्या कन्येचा साखरपुडयातच विवाह संपन्न
किनवट = (तालुका प्रतिनिधी) येथील तालुका मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष अनिल भंडारे यांच्या कन्येचा विवाह
दिनांक 6/4/2021 रोजी त्यांच्या किनवट शिवाजी चौक
येथील राहत्या घरीच काही मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोना विषाणूच्या वातावरणात
सोशल डिस्टन्स, मास, सेनीटायझरचा वापर करत काळजीपूर्वक रित्या साखरपुड्याच्या कार्यक्रमातच विवाह सोहळा पार पडल्यामुळे त्यांचे अनेक स्तरातून अभिनंदन होत आहे.
सविस्तर असे की वारंगा फाटा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील वर वसंत कोंडाप्पा नखाते यांचे सोबत
6/4/2021 रोजी वधू स्नेहा अनिल भंडारे यांच्या कन्येचा साखरपुड्याचा नियोजित कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
पण कोरोनाच्या वातावरणात मोठ्या धुमधडाक्यात विवाह सोहळ्याचे आयोजन रद्द करून साखरपुड्याच्या कार्यक्रमातच विवाह लावण्याचा निश्चय करण्यात आला.
आणि अत्यंत साध्या पद्धतीने राहत्या घरीच विवाह लावण्यात आला. या स्तुत्य उपक्रमाचे अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले.
विवाह सोहळ्यास भाजपाचे नेते धरमसिंग राठोड, माजी भाजपा
तालुकाध्यक्ष राघू मामा, पत्रकार संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष शकील भाई बडगुजर
पत्रकार चतुरंग कांबळे, गोकुळ भवरे दिलीप पाटील, दत्ता जायभाये, मलिक चव्हाण,
संतोष अनंतवार किशन भोयर, प्रदीप वाकोडीकर,
किरण ठाकरे, सय्यद इम्रानअली, कामराज माडपेल्लीवार, किशन परेकार व अनेक पत्रकार राजकीय पुढाऱ्यांनी,