Ticker

6/recent/ticker-posts

टिपू सुलतान ब्रिगेड, ढाणकी तर्फे नरसिंहानंद सरस्वती विरुद्ध तक्रार


टिपू सुलतान ब्रिगेड, ढाणकी तर्फे नरसिंहानंद सरस्वती विरुद्ध तक्रार         

दि. 2 एप्रिल, 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजता प्रेस क्लब द्वारे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दीपक त्यागी उर्फ नरसिंहानंद सरस्वती नावाच्या एका 

साधू वेषातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने जगाला प्रेम,

 मानवता आणि शांतीचा संदेश देणारे महामानव इस्लामचे शेवटचे प्रेषित मुहम्मद स. अ. स. यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांचा घोर अपमान केला आहे.

 त्याचा तो विडीओ सोशल मीडिया वर वायरल सुद्धा झालेला आहे.

 प्रेषित मुहम्मद स. अ. स. यांच्या प्रती जगातील सर्व जाती आणि धर्मातील लोकांमध्ये अत्यंत आदराचे स्थान आहे. 

त्यामुळे  नरसिंहानंद सरस्वती बद्दल लोकांमध्ये, विशेषतः मुस्लीम समुदायामध्ये प्रचंड रोष आहे. 

नरसिंहानंद सरस्वतीने जाणीवपूर्वक मुस्लीम धर्मीयांच्या भावना दुखविण्याचा आणि समाजात दुही व तेढ निर्माण करून देशातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. 

तरी नरसिंहानंद सरस्वतीवर संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल अटक करण्यात यावी 
अशी तक्रार टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ. जहीरुद्दिन पठाण यांच्या  मार्गदर्शनानुसार टिपू सुलतान ब्रिगेड ढाणकी, ता. उमरखेडच्या वतीने बिटरगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली. 

यावेळी ढाणकी शहर अध्यक्ष शेख नज़र शेख महमूद,

  सय्यद अझहर सय्यद हादी, शेख ज़मीर शेख बशीर (मिर्झां), शेख अलीम शेख खादर खुरेशी  उपस्थित होते.