मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी मांडलेले मुद्दे:
संपूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्रसुद्धा कुठेही मागे नव्हता आणि नाही.
कोविडविरोधातल्या या लढ्यात राजकारण आणू नये. सर्व राजकीय पक्षांना पंतप्रधानांनी समज द्यावी.
राज्याने मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढवल्या असून आणखी वाढवण्यात येत आहेत.
……………….
महाराष्ट्रात चाचण्यांचा वेग चांगला असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाचे मत.
राज्यात एकूण चाचण्यात ७१ टक्के आरटीपीसीआर आणि २८ टक्के अँटीजेन होतात जे समाधानकरक असले तरी वाढवायला हवे - केंद्रीय आरोग्य सचिव
………………….
केंद्राने जादा १२०० व्हेंटीलेटर्स द्यावेत
राज्याला लसीचा जादा पुरवठा करावा तसेच इतर राज्यांतून ऑक्सिजन व व्हेंटीलेटर्स उपलब्ध करून द्यावे.
एप्रिल अखेरपर्यंत महाराष्ट्राला लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा होणे अत्यावश्यक आहे.
……………………….
हाफकिनला लस उत्पादन करण्यासाठी राज्य शासनाने पाठवलेल्या प्रस्तावाला लवकर मान्यता द्यावी. त्यामुळे लसीकरणाला वेग मिळेल
१५ एप्रिलनंतर १७.४३ लाख डोसेस देण्यात येतील असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले असले तरी आमच्या मागणीप्रमाणे एकदमच पूर्ण वितरण व्हावे.
२५ वर्षापुढील सर्वांचे लसीकरण गरजेचे आहे
………………………
देशभरातील औषध उत्पादकांकडून रेमिडेसेवीरचा पुरवठा व्हावा.
या औषधाच्या किंमतीवर ड्रग कंट्रोलरचे नियंत्रण असावे.