Ticker

6/recent/ticker-posts

/हिंगोली : नांदेड जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी बैठक आयोजित करून जिह्यातील संपूर्ण परिस्थिती माहिती जाणून घेतली या बैठकीला जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, अन्न व औषध विभागाचे सहायक


नांदेड /हिंगोली : नांदेड जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी बैठक आयोजित करून जिह्यातील संपूर्ण परिस्थिती माहिती जाणून घेतली या बैठकीला जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त ,

जिल्हा आरोग्य  अधिकारी यांच्यासह नांदेड शहरातील खाजगी हॉस्पिटलचे डॉक्टरांची  उपस्थिती होती. 

 मागील आठ दिवसापासून खासदार हेमंत पाटील नांदेड जिल्हयातील आणि एकंदरीतच हिंगोली लोकसभा मतदार संघातील सर्वच तालुक्याच्या दौऱ्यावर  होते . 

यादरम्यान त्यांनी   प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना आणि डॉक्टरांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या व त्यावर तात्काळ तोडगा काढण्यासाठी तातडीने बोलाविली ,

 या बैठकीला नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर , 

जिल्हाधिकारी, डॉ. विपीन इटणकर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे  सहायक आयुक्त  रोहित राठोड, जिल्हा आरोग्य  अधिकारी डॉ. बालाजी शिंदे

  यांच्यासह नांदेड शहरातील खाजगी रुग्णालयाचे डॉ.सोमेश्वर पतंगे,डॉ.संजय कदम, डॉ. पुरुषोत्तम पवार,डॉ. नितीन शेटे, डॉ. देवेंद्र पालीवाल, डॉ.संजय पतंगे, डॉ. कोटकर यांची उपस्थिती होती .

 यावेळी खासदार हेमंत पाटील म्हणाले कि, हदगाव व किनवट तालुक्याचा दौरा केला असता मला  कोविड सेंटरच्या गंभीर  परिस्थितीची जाणीव झाली . 

त्यामुळे हदगाव आणि किनवट  येथे तातडीने प्राणवायू सुविधायुक्त ५० खाटांची सुविधा त्याच ठिकाणी उपलब्ध होईल कोविड रुग्णांना नांदेड किंवा इतरत्र आणण्याची गरज भासणार नाही . 

तसेच यावेळी प्राणवायू सिलेंडर व रेमडीसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्या बाबत आढावा घेण्यात आला .

 तसेच यावेळी वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मुबलक प्रमाणात रेमडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे  सचिव अभिमन्यू काळे यांना सूचना दिल्या . 

खाजगी कोविड सेंटरला ऑक्सिजन आणि रेमडीसीवीर चा पुरवठा होत नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे मत डॉक्टरांनी मांडले, तेव्हा रेमडीसीवीर च्या वाटपामध्ये भेदभाव होऊ नये 

यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः देखरेख करावी तसेच प्रत्येक तालुक्याला प्रशासनाच्या वतीने तहसीलदारांच्या  अधिपत्याखाली  तीन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात  यावी आणि त्यांचे संपर्क सर्व नागरिकांना उपलब्ध करून द्यावेत. 

जेणेकरून रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही.

 तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी कोणत्या रुग्णालयात किती व्हेंटिलेटर , प्राणवायूयूक्त  खाटा शिल्लक  आहेत. 

या संदर्भातील माहिती नियमितपणे प्रसारमाध्यमातून किंवा सोशल मीडियामधून प्रसारित करावी. 

 यामुळे रुग्ण  आणि रुग्णाच्या नातेवाईकांना सोयीचे होईल . तसेच किनवट , माहूर हदगाव , 

हिमायतनगर येथे १५ दिवसाच्या आत नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याच्या सूचनाहि खासदार हेमंत पाटील यांनी दिल्या .

#COVID19 #maharashtra #Hingoli #Nanded #Shivsena