Ticker

6/recent/ticker-posts

किनवट-आदीलाबाद या आतंरराज्य मार्गावर असलेल्या महाध्यान भूमी महाविहार,तामसी,जिल्हा आदीलाबाद येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न,बोधिसत्व, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व महान बौद्ध सम्राट अशोक यांची संयुक्त जयंती दिनांक २४ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली


किनवट-आदीलाबाद या आतंरराज्य मार्गावर असलेल्या महाध्यान भूमी महाविहार,तामसी,जिल्हा आदीलाबाद येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न,बोधिसत्व, 

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व महान बौद्ध सम्राट अशोक यांची संयुक्त जयंती दिनांक २४ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 जयंती सोहळ्याचे उद्घाटक  बोथ मंडळाचे आमदार श्री.बापुराव राठोड यांच्या हस्ते या तिन्ही महामानवांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 


महाध्यान भूमी महाविहार केंद्राचे अध्यक्ष भन्ते  शाकू बोधीधम्मा व संस्थेचे पदाधिकारी यांच्या आमदार श्री बापूराव राठोड यांचा शाल,पुष्पहार व "भगवान बुद्ध आणि त्यांचा उपदेश " हे ग्रँथाचे पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. 
यावेळी भन्ते शाकू बोधीधम्मा यांनी बोथ मंडळाचे आमदार यांना महाध्यान भूमी महाविहार परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी विविध मागण्याचे निवेदन केली आहे.

या परिसराचे सुशोभीकरण करण्याकरिता माझ्या आमदार निधीतून कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार बापुराव राठोड यांनी भन्ते यांना सांगितले आहे. 
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष किशनराव ठमके,सचिव संतोष सिसले लक्ष्मीकांत कांबळे, बाबू सोनूले,दयानंद भगत,किरण कहाते,अविनाश कयापाक,उत्तम हनवते आदी उपासक उपस्थित होते.