Ticker

6/recent/ticker-posts

राजगड तांडा येथे पाणीटंचाई तीव्र संकट, पाणीपुरवठा उपविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष.किनवट तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत असताना सगळीकडे covid-19 विषाणूचा प्रादुर्भावही जोमात वाढत असतानाच ग्रामीण भागातील जनता मात्र या दोन्ही समस्या पेक्षा पाण्याची


राजगड तांडा येथे पाणीटंचाई तीव्र संकट, पाणीपुरवठा उपविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष.

किनवट 
तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत असताना सगळीकडे covid-19 विषाणूचा प्रादुर्भावही जोमात वाढत असतानाच ग्रामीण भागातील जनता मात्र या दोन्ही समस्या पेक्षा पाण्याची 

समस्या अतिशय तीव्र भासत असल्याने सध्यातरी यापेक्षाही पाणीटंचाईचे संकट तालुक्यात मोठे वाटत आहे. 

राजगड तांडा येथील शासनाकडून भारत निर्माण स्वजलधारा योजनेअंतर्गत पंचेचाळीस लक्ष रुपये मिळू न सदरील योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याने हंडाभर पाण्यासाठी 
राजगड वासियांना प्रचंड त्रासांना सामोरे जावे लागत आहे. मात्र प्रशासन या अत्यावश्यक बाबीकडे लक्ष देत नसल्याने सामाजिक कार्यकर्ता नवीन जाधव, 

इतरही ग्रामस्थ पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी वरिष्ठ प्रशासनाकडे केली आहे.

 तालुक्याच्या मुख्यालयापासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या राजगड तांडा हे सुमारे शंभर कुटुंबाच्या लोकवस्तीचे गाव असून सुरुवातीपासून पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जात आहे. 

पाणी प्रश्न अतिशय गंभीर बनला असून हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून रात्री-बेरात्री महिला पुरुष लहान मुले पाणी उपसण्यासाठी सार्वजनिक विहिरीवर धडपड करताना दिसून येत आहे. 
महिला लहान मुलांना सोबत घेऊन पाणी भरण्यासाठी विहिरीवर जात असून अंधार रात्री मध्ये एखादी विपरीत घटना घडल्यास याला जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. 

ग्रामसभेत ग्राम समिती गठित करून गेलेल्या पाणीपुरवठा समिती यांच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन जवळपास पन्नास टक्के काम पूर्ण होऊन 

कागदोपत्री काम पूर्ण झाल्याचे दाखवून संबंधित समिती व ठेकेदार यांच्या संगनमताने संपूर्ण निधी उचल केल्याचा आरोप निवेदनात केला आहे. 
प्रशासनाच्या तीव्र उदासीनतेमुळे गावकऱ्यांना 
पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून कुणाच्या संकटा पेक्षाही आमच्यासाठी 

पाणीटंचाईचे संकट मोठे असल्याचे नवीन जाधव यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.