Ticker

6/recent/ticker-posts

आयडीया व्होडाफोन, जिओ, बि. एस. एन. एल.ची सेवा कुचकामी..0 विद्यार्थ्याचे शैक्षणीक नुकसान ; मोबाईल फोन झाले फक्त शोभेची वस्तु


आयडीया व्होडाफोन, जिओ, बि. एस. एन. एल.ची सेवा कुचकामी..

0 विद्यार्थ्याचे शैक्षणीक नुकसान ; मोबाईल फोन झाले फक्त शोभेची वस्तु ...!

माहुर - (प्रतिनिधी .)

माहुर शहरासह तालुक्यात जिओ, बी. एस. एन. एल.,आयडीया, वोडाफोन कंपनीचे टावर असुनही नेटवर्क अभावी तिन्ही कंपणीच्या 

ग्राहकाचे फोन लहान मुलांच्या हाताचे खेळणे झाले असुन शोभेची वस्तु झाली.

कोरोना संसर्गामुळे शहरात किंवा बाहेर गावी शिक्षण घेणारे विद्यार्थी आपापल्या 

गावाकडे आली आहे. 

त्यांचेही ऑनलाइन क्लासेस सुरू आहे.मात्र  नेटवर्क नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे 

शैक्षणिक नुकसान होत आहे. 
त्यामुळे गेल्या १५ दिवसा पासुन तीनही कंपनीच्या नेटवर्क अभावी शालेय विद्यार्थीच्या 

ऑनलाईन अभ्यासात खंड पडीत असल्याच्या तक्रारीत वाढ झालेली 

असुन नेटवर्क अभावी विद्यार्थीचे शैक्षणीक नुकसान होत असल्याची ओरड होत आहे.

महत्वाच्या कामा निमित्त एकमेकाशी दुरध्वनीवर संपर्क साधुनही व्यवस्थीत पुर्ण बोलणे होत 

नसल्याने नेटवर्क अभावी माकडचेष्टा कराव्या लागत असल्याने 
 विविध कंपनीचे सिम असलेल्या ग्राहकांना नेटवर्क अभावी नेटपॅक मारुनही नाहक मनस्ताप 

सहन करावा लागत असल्याने संबंधीत अधिकाऱ्यांनी 

याकडे लक्ष देऊन  कंपनीचे सदोष नेटवर्क दुरुस्त 

करुन पुर्ववत सुरु करुन ग्राहकांना होणारा त्रास दुर करावा 
अन्यथा तालुकाभर सिम पोर्ट करण्याची मोहीम 

राबवली जाणार असा इशारा व्हीआय, जिओ, बि. एस एन. एल. च्या ग्राहकांनी दिला आहे.