Ticker

6/recent/ticker-posts

किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार असे मत उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी किर्तिकिरण एच पुजार यांनी व्यक्त केले. दि.14-5-2021 शुक्रवार रोजी भुमिपुजन राजगड येथे करण्यात आले

किनवट तालुक्यातील  शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार असे मत उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी किर्तिकिरण एच पुजार यांनी व्यक्त केले. 

 दि.14-5-2021  शुक्रवार रोजी भुमिपुजन राजगड येथे करण्यात आले.

मिरा क्लिन फ्युल ,गव्हाणे बायोफ्युल प्रा.लि आणि जयआनंद शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त 

विद्येमाने जैव ईंधन व सेंद्रिय खत निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे भुमीपुजन किर्तिकिरण पुजार यांच्या हस्ते झाले .
अध्यक्ष म्हणून राजगड येथील सरपंच सौ.ईंदीराबाई जटाळे तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन आनंद मच्छेवार नगराध्यक्ष ,भागवत देवसरकर 

प्रदेशाध्यक्ष डॉ.विठ्ठलराव विखे-पाटील, प्रशांत ठमके,शिवा क्यातमवार,

बालजी मुरकुटे तालुका प्रमुख शिवसेना ,.राजु पाटील सोळंके माजी.पं.स उपसभापती ,मा.सुरेश पाटील सोळंके  हे होते.

किर्तीकिरण पुजार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना  शेतकऱ्यांना या प्रकल्पामुळे चांगले दिवस येणार आहे.

शेतातील कोणताही ओला कचरा विकत घेतल्या जाणार आहे. 

शेतकऱ्यांचे स्थलांतर थांबेल.युवकांना रोजगार भेटेल . शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होईल . 

तालुका प्रदूषण मुक्त होईल .

त्याच बरोबर केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल व शेतकऱ्यांचा आर्थिक विकास कसा होईल यावर त्यांचा भर आहे.या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल . 
विनायक गव्हाणे शेतकऱ्यांसाठी हे करत आहेत हे पाहून आनंद झाला. 

शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट यांच्या विविध योजनांची माहिती यावेळी किर्तिकिरण पुजार यांनी दिली . 

यावेळी प्रास्ताविक प्रा.डाॅ.मारोतराव गव्हाणे यांनी केले 

तर सुत्रसंचलन राजेश मोरतळे यांनी केले या प्रसंगी अनिरुद्ध केंद्रे ,जयआनंद शेतकरी 

उत्पादक कंपनीचे संचालक चंपतराव जाधव, सुमनताई तिडके,मारोती भरकड ,रामराव राठोड, विनायक करेवाड,मारोती जाधव, अमरदिप कदम आदी   उपस्थित होते . 

आभार प्रदर्शन करताना विनायक गव्हाणे म्हणाले कि, 
येणा-या 26 जानेवारी 2022 ला कंपनीचे पुर्ण काम उभारलेले असेल व जैवईंधन व सेंद्रिय खत निर्मिती होईल असा विश्वास दिला . 

कोरोणाच्या परीस्थितीमुळे सदरील कार्यक्रमाचे प्रसारण फेसबुक लाईव्ह करण्यात आले होते.