Ticker

6/recent/ticker-posts

दत्तात्रेय भालेराव (सेवानिवृत्त डीवाएसपी) यांचे 18 रोजी पहाटे रुबी हाॅस्पीटल पुणे येथे निधन


दत्तात्रेय भालेराव (सेवानिवृत्त डीवाएसपी) यांचे 18 रोजी पहाटे रुबी हाॅस्पीटल पुणे येथे निधन

*किनवट शहर प्रतिनिधी:राज माहुरकर
 


श्री डी. व्ही भालेराव यांचा जन्म चेरा ता. जळकोट जि. लातूर येथील येथे झालेला. 

त्यांचे भाऊ स्वर्गीय नारायण भालेराव हे कमी शिकलेले होते पण फार स्वाभिमानी व आंबेडकरवादी वृतीचे होते.

 तसेच सर्वानी शिकले पाहिजे हा त्यांचा ध्यास असायचा व तसे त्त्यानी त्यावेळी स्वत:चे घर व  समाज सुशिक्षीत झाला पाहीजे यांवर लक्ष दिलेले होते. 

त्याच ध्यासातून श्री दतात्रेय भालेराव यांचे चेरा येथील प्राथमिक शाळेत शिक्षण सुरू झाले.

 श्री नारायणराव भालेराव यांची स्वाभिमानी व सामाजिक अन्याय सहन न करण्याची बाणी वृतीमुळे त्यांनी स्वयंमपूर्तता

 यावी म्हणून चेरा हे गाव सोडण्याचा ५५ ते ६० वर्षांपूर्वी निर्णय घेतला व त्यांचे सर्व कुटूंबीय चंद्रपूर जिल्हा व आंध्र प्रदेश च्या सिमावर्ती गावात वस्ती करण्यासाठी गेले 

तेथे जमीनी मिळवल्या पण त्याकाळी त्यांची साधारण १५ वर्षे शासनातर्फे भरपूर ससेहोलपट त्रास झाला व त्यांना अस्थिरतेचा कायम सामना करावा लागला.


अशी परिस्थिती असतेवेळी सुद्धा नारायणरावानी भाऊ दतात्रेय व शामराव यांचे शिक्षणात खंड पडू दिला नाही व दुर्लक्ष केले नाही.

 दतात्रेय भालेराव यांना जांब येथील निती निकेतन विद्यालयात प्रवेश व तेथील बोर्डींग मधे प्रवेश घेतला व दहावी चे शिक्षण पूर्ण केले.


त्यानंतर दतात्रेय भालेराव यांचे चंद्रपूर/नागपूर  येथे पुढील शिक्षण झाले. 

यांचे शिक्षण सुरू असताना त्यांच्या कुटुंबास  काही प्रमाणात स्थिरता येवून ते केकेझरी ता. जिवती जि.चंद्रपूर येथे कायम/तात्पुरते स्थिरावले व तेथेच शेती करत राहिले,

 तेथेच त्याच जमीनीत त्यांचे वडील स्व. विठ्ठलराव भालेराव ( *फार मेहणती वृतीचे* ) विसावले व त्याची समाधी पण केकेझरीत आहे.


दतात्रेय भालेराव यांचे शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळविण्यासाठी धडपड सुरू झाली यासाठी नारायणराव भालेराव जातीने लक्ष घालत होते. 

दतात्रेय भालेराव यांना एसटी महामंडळात नोकरी मिळाली, पण त्यांनी त्यात समाधान म्हणून स्वस्थ बसले नाहीत, 

अभ्यास करून लोकसेवा आयोगाची परीक्षा देवून पी.एस.आय. झाले. केकेझरी येथे पण प्रशासनातर्फे थोडी आस्थिरता होत 

असल्यामुळे त्यांचे कुटूंब लोणी ता. किनवट जि. नांदेड येथे स्थिरावले व सध्या ते तेथे कायम वास्तव्यास आहे. 


जिवनात नोकरीमुळे तसेच कायम स्थिरावण्याच्या अस्थिरपणातसुद्धा दतात्रेय भालेराव यांनी *मुळ गाव चेरा व तेथील नातेवाईक , मित्रमंडळी व शाळा विसरली नाही

 ते चेरा गावाच्या संपर्कात असायचे. शाळेला  नेहमी सहकार्य करायचे. अशा परिस्थतीतही दतात्रेय भालेराव यांनी 

त्यांच्या कुटूंबियाना शिक्षणापासून दूर होऊ दिले नाही. आज त्यांचे पुतणे, 

नातू , जावई सून हे सर्व उच्चशिक्षीत आहेत , कोणी पीएचडी प्राध्यापक , शिक्षक, डाॅक्टर, इंजिनीअर, राजकारणी ,  

ड्रायव्हर असे अनेक प्रकारचे कामावर स्थिरावून आनंदी दिवस जगत आहेत. दतात्रेय भालेराव हे *पी.एस.आय. ते डि.वाय.एस.पी.* 

असा नोकरीतील प्रवास करून नागपूर कामठी डिव्हीजन येथून सेवानिवृत  होऊन नांदेड येथे घर घेवून स्थिरावलेले होते. 

मुलगी पुजा ही पुणे येथे शिक्षण घेत असल्यामुळे तिच्याकडे गेले होते, तेथेच त्यांना कोरोनाची लागण झाली  

त्यांनी झुंज देवून कोरोनावर मात्त केलेली होती

 पण पुढे शरीरानी त्यांना साथ दिली नाही व आज पहाटे त्यांचे दुःखद निधन झाले.