किनवट (दत्ता जायभाये) शहरात चालू असलेले महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम 19
कोटी रुपयाचे असून,ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे पाईप व दर्जेदार रस्ते खोदून टाकत आहेत
परिणामी शासनाची ह्या अनमोल जीवनदायी ठरणार्या योजनेचा पुरता बट्ट्याबोळ होत
असून त्यावर संबंधित नगरपालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष का ?
असी लेखी तक्रार करत तात्काळ ते थांबवुन नियोजनबद्ध, कायमस्वरूपी टिकणारे,
उच्च दर्जाचे काम करण्यात यावे असे निवेदन भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष एस लुखमान यांनी किनवट नगरपालिकेचे
मुख्याधिकारी यांना व वरिष्ठ प्रशासनाला निवेदनाच्या प्रती सादर केल्या मुळे सत्ताधारी
भाजपाला घरचाच आहेर समजल्या जात आहे.
सविस्तर वृत्त असे की,
सदर विषयांकित योजनेच्या माध्यमातून शहराला 19 कोटी रुपये वाढीव पाणीपुरवठा साठी मंजूर झाले आहे.
खरे पण ते काम पक्के व दर्जेदार होणे महत्त्वाचे आहे. पण तसे होताना दिसत नाही,
पाणी साठवण टाकी बांधण्याच्या अगोदरच शहरातील गल्लीबोळातील दर्जेदार पक्के रस्ते खोदून त्यात
निकृष्ट दर्जाचे पाईप गाडण्याचे काम प्रगतीपथावर होताना दिसते,
परिणामी सदर 'पाइपला लाईफ' नसून आणि पाण्याचे ट्यूब लेवल न काढताच घाईगडबडीत
तेही तीव्र उन्हाळ्यात कशासाठी? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
अनेक गल्ली वार्डात नळ योजनेची जुनी पाईपलाईन फुटत आहे.
त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला भर उन्हाळ्यात सामोरे जावे लागत आहे.
ह्या सर्व निक्रष्ट परिणामाचा किनवट शहरवासीयांना जिवनभर परिणाम भोगावे लागतील,
सदर होत असलेले निकृष्ट व नियोजन शून्य काम तात्काळ थांबवावे
अन्यथा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक कडून नगरपरिषद कार्यालयावर जनतेला घेऊन घागर मोर्चा काढण्यात येईल